Saturday, December 18, 2010

घे रंग प्रेमाचा

नको उचलूस भाता, नाजूक हातांनी
नजरेचे बाण, दे या हृदयात ठेवुनी.

नको लावुस काजळ, रेखीव डोळ्यांतुनी
ठेव ती जागा, माझ्यासाठी राखुनी.

नको फिरवूस लाली, ओठांवरुनी
घे रंग प्रेमाचा, या ओठांमधुनी.


- राजन महाजन
१९ डिसेंबर २०१०

टीप - रात्री ई टीवी उर्दूवर मुशायरा ऐकताना, एक शेर ऐकून, पहिल्या दोन ओळी सूचल्या. पुढे त्याचाच थोडासा विस्तार केला.

Thursday, October 28, 2010

Chat History, a blessing !

पूर्वीचे Chats वाचण्यात किती मजा असते हे मला आता मंगेशबरोबरचे Chats वाचताना जाणवतेय. त्याचा खोडकरपणा, हजर्जबाबीपणा, PJ मारण्याची कला, विनोदबुद्धी या चॅट हिस्टरी मुळे जपली गेलीय. तेच तेच chats परत परत वाचले तरी कंटाळा येत नाही. काही वेळा तर असे हसू येते की ऑफीसमध्ये आजु-बाजूचे “काय झाले ह्याला ?” अशा नजरेने पाहायला लागतात.
प्रत्येकवेळी chats वाचताना असे वाटते की मंगेशशी प्रत्यक्ष संभाषण चालू आहे. chats वर त्याने कधी सरळ पणे ‘नमस्कार’, ‘हाय’ किवा ‘हॅलो’ म्हणून चॅट सुरू केल्याचे मला आठवत नाही आणि तसे चॅट हिस्टरी मधेहि सापडणे कठीण. chat ची सुरूवात “कुमार !!” किवा “जय जय रघुवीर समर्थ” किवा “बम भोले” किवा कुठल्यातरी गाण्याच्या ओळीने व्हायची. मधे मधे PJs पेरलेले असायचे. मित्रांचा कोणत्यातरी उपमेने उल्लेख असायचा. कित्येकांशी मी चॅट केले आहे पण मंगेश बरोबरचे chats वाचण्यात जी धमाल येते तशी इतर एकही चॅटमध्ये नाही.

Thanks, Google….Thanks, Gmail…Thanks, Chat History….तुमच्या मुळे हे संवाद, या स्मृति चिरंतन माझ्या जवळ राहणार.

Extracts of few chats

6:00 PM mangeshgdeshpande: sakalche 10 wajle ka re
me: ho
6:01 PM mangeshgdeshpande: mhanje tu atta atlantic samudrachya madhomadh asnar
me: barobar
6:02 PM mangeshgdeshpande: wov!!!!!
panyat kolambi milat aslya tar bagh
me: size ?
6:03 PM mangeshgdeshpande: kiti pan chalel
tua pelvel ase bagh
4:26 PM mangeshgdeshpande: tu fir aa gaya


4:33 PM me: ha saab
4:34 PM mangeshgdeshpande: mauj karo
4:35 PM me: thik
tu 1st Aid la yenar aahes na
mangeshgdeshpande: ho 100% June 10 chya weekend la na
4:36 PM me: mini dv gheun ye
nahitar katti
mangeshgdeshpande: Uuuuuuuuuuuu Huzur - tera tera tera suruuuuur
me: ha ha ha ha ha ha ha ha
1:43 PM mangeshgdeshpande: jai jai raghuveer samartha
me: jai sri ram
mangeshgdeshpande: aaj Gokhale swataha amhala baher jevaila jau mhanale
1:44 PM me tyache maan nahi modnar - to pan ek udyonmukh khanara ahe
me: ha ha
mangeshgdeshpande: tu pan alas tar - youth ani experience milun ekatra kase khatat tula pahaila milel
12:37 PM mangeshgdeshpande: kumar!!!!
weekend chya trek la janar ahat na
12:38 PM me: hoy
mangeshgdeshpande: ekdam kutta mafiq
me: ho
mangeshgdeshpande: by the way udya me exactly 14000 diwsancha honar!!!!
12:39 PM me: great
9:56 AM me: when will i get the CD.....today
mangeshgdeshpande: i will reach around 8.30
me: ok
mangeshgdeshpande: MK chya gharachya ithe pataka ani torne lavun ani rangolya kadhun ani gulal ani bukka udvat, dhol tashansaha ubha raha
9:58 AM me: ok....8.30 la....suvasini bolavato..tula ovalayala
mangeshgdeshpande: baher ek pati sudha lihun thev saying -
bhatkya ani vimukta jamatiche shriyut deshpande hyanche mulund madhe swagat mhanoon
9:59 AM me: bar
4:02 PM mangeshgdeshpande: jai bhim
jai nakul
me: jai Abhimanyu
aaj meeting aahe
me: yenar na ?
mangeshgdeshpande: nahi yenar
4:03 PM me yadavankadun soot magun ghetli ahe
me: secretary la kalavales ka ? nahi yenar te
mangeshgdeshpande: nahi kalavle
4:04 PM me: tyacha mail nahi vachalas
mangeshgdeshpande: tyacha cope sahan karaiche samarthya ahe mazyat
10:38 AM mangeshgdeshpande: jai yogeshwar jai chaturbhuj
10:39 AM me: Jai Sudarshan
Mayajalamadhil chakramchi Jaga pahili ka ?
kashi vatate
10:40 AM mangeshgdeshpande: kal bhairavachya krupene site bari hoinar ase chitra disat ahe
me: ekdum Dhaasu ki nahi ?
mangeshgdeshpande: ekdam chabuuk
me: Kaal Bhairav nahi.....Kumar Rajendra Swaminchya krupene
10:41 AM mangeshgdeshpande: sarva swaminchya vaar to kaal bhairav baslai
to facta tyachya swamin marfat asha goshti ghadvun aanto
aso - mazya tarfe swataha chi path ekda thoptun ghe
mangeshgdeshpande: jeetam jeetam
2:44 PM me: kashabaddal
mangeshgdeshpande: adhi amhi dalit hoto. ata amhi be devlat janar
me: ??
2:45 PM kahi kalale nahi
2:51 PM mangeshgdeshpande: hota asa kadhi kadhi
2:52 PM me: tula kod zale aahe ka ?
mangeshgdeshpande: nahi
nustich khaaz yete ahe
2:53 PM "hatala"
2:38 PM mangeshgdeshpande: ati tati chya samnyat ati chi tati var maat
2:39 PM me: chhan
5:06 PM mangeshgdeshpande: arey - tu fir aa gaya?
me: hari om
5:07 PM mangeshgdeshpande: dekh main kaise - HAMESHA SATARK rahata hun
5:09 PM me: bhole
mangeshgdeshpande: mag zali tayari mahuli chi?
5:10 PM me: MB incharge aahe
mangeshgdeshpande: mag sudeep ka khup kaam ahe mhanto?
5:11 PM me: mahit nahi
mangeshgdeshpande: thik ahe - javani cha josh asel
0:43 AM mangeshgdeshpande: Hurry Home!!!!
10:44 AM me: 2.5 kms jogging/Warm up/45 mins cycling
Vithucha Gajar Hari Namacha Zenda Rovila
10:47 AM mangeshgdeshpande: 5 Kms jogging + 75% of Oka's exc + thode maze swataha che exc + pranayam. Chandrabhage chya kathi daav mandila!!!!
10:49 AM me: Dhingchyang ! Dhichyang !!
10:52 AM mangeshgdeshpande: hum hain lohe ke chane samzho na hame hulwa
me: Hum means Hum Dono
10:57 AM mangeshgdeshpande: barobar
sabko bol do
chabayenge to daat toot jayenge
11:00 AM mangeshgdeshpande: sundas la bastana sudha pathivar sack gheun baas
mhanje uthta basta pan vyayam hoil
use Indian Style WC only

Wednesday, October 20, 2010

मित्रा..

मित्रा..
खूप आठवण येते रे तुझी..
काय घेणार तू परत यायला ?

आता मोठी स्वप्ने पाहणारा कुणी नाही,
ती खरी करणारा कुणी नाही,
सळसळता उत्साह वाहणारा कुणी नाही,
दुसर्यात आत्मविश्वास जागवाणारा कुणी नाही,
उदाहरण घालून देणारा कुणी नाही,
निखळपणे भांडणारा कुणी नाही,
सर्वाना सामावून घेणारा कुणी नाही,
खेची ट्रेक्स करणारा कुणी नाही,
क्लाइंबिंग करणारा तर कुणीच नाही,

मित्रा..
खूप आठवण येते रे तुझी..
काय घेणार तू परत यायला ?


- राजन महाजन
२०-१०-२०१०

Wednesday, August 11, 2010

माझ्या बाळांनो

तुमच्यासाठीच सारे चालू आहे, बाळांनो,

व्यवहारी जग तुम्हाला समजणार नाही, बाळांनो,

प्रत्येक गोष्टीसाठी इथे पैसा लागतो, बाळांनो,

दूरदेशी राहतोय मी, तुमच्याचसाठी रे, बाळांनो.

वाटते रोज कडकडून तुम्हाला भेटावे, बाळांनो,

खूप खूप दंगा करावा, बाळांनो,

मागे मागे तुमच्या धावावे, बाळांनो,

आईच्या ओरड्यातून तुम्हाला सोडवावे, बाळांनो,

तुमच्या चेहर्यावरील आनंद लुटावा, बाळांनो,

पण नाही होत रे माझ्या मनासारखे, बाळांनो

कारण….

प्रत्येक गोष्टी साठी इथे पैसा लागतो, बाळांनो,

त्याशिवाय जगणे अशक्य आहे, बाळांनो,

मला समजून घ्याल ना रे, माझ्या बाळांनो,

दूरदेशी राहतोय मी, तुमच्याचसाठी रे, बाळांनो.



- राजन महाजन
१२ ऑगस्ट २०१०

Tuesday, August 3, 2010

सुस्साट SMS

सुस्साट SMS

फ्रेंडशिप डे च्या निमित्ताने बरेच SMS, ईमेल आले. त्यातील ९८% नेहमीचेच गोड – गोड होते. 2 SMS अश्लील पण एकदम भिडणारे होते. अश्लील म्हणजे शिवराळ भाषेतील. सभ्य माणसे जी भाषा बोलत नाहीत त्या भाषेतले. पण त्या शिवराळ भाषेतून व्यक्त होणार्‍या भावना साध्या, श्लील भाषेत मांडणे निव्वळ अशक्‍य आहे.

हे SMS ब्लॉग वर टाकावेत की न टाकावेत अशा द्विधा मन:स्थितीत होतो. शेवटी मनाचा हिय्या केला आणि टाकुयाच असे ठरवले. शिवराळ भाषेची एक गोडी असते, त्या मागील भावना आपण लक्षात घेतल्या तर.
नुसते स्वतंत्रपणे (वीना संदर्भ) हे शब्द ऐकायचे म्हटले की नको वाटते. त्यात सुधा अशी एक फॅशन आहे की इंग्लीश मधील शिव्या सहज खपून जातात अगदी मुलींच्या तोंडी ही मी त्या ऐकल्यात (उदा. asshole, I'll b screwed, oh fuck) पण मराठी / हिंदीतल्या शिव्या दिल्या की लगेच असंस्कृत म्हणून गणना होते.

नमनलाच घडाभर तेल झालेय. थेट SMS च लिहितो –


आयुष्यात एकतरी मित्र असावा,
गांडीवर लाथ मारणारा,
बापाच्या नावाने हाक मारणारा,
अन् कधी ती दिसली तर आपल्या नावाने ओरडणारा.
एकतरी मित्र दररोज “लXड्या कसा आहेस ?” विचारणारा,
पोरिसमोर शिव्या देऊन शाइनिंग मारणारा,
किती पण ‘टल्लि’ असला तरी गाडीवरून घरी सोडणारा,
प्रत्येक नवीन गोष्टीवर “भेXXद पार्टी कधी देणार ?” म्हणून विचारणारा,
भांडण झाले तरी लगेच विसरणारा, आयुष्यात कधीही न विसरणारा.
खरच असेच मित्र असावेत…येडXवे !!



बचपन से मुझे दो ही चीज़ ज़्यादा मिली है,
बिस्कट और दोस्त….
फ़र्क सिर्फ़ इतना है की
बिस्कट मारी के मिले और दोस्त…
चूXXमारी के..!


टिप - शिवराळ भाषा जशीच्यातशी (ब्लॉगवर) वापरण्याचे धारिष्ट्य नाही म्हणून प्रसंगी XXX चा आधार घेतला आहे. जाणकार मंडळिना वाचताना काही अडचण येणार नाही याची मला खात्री आहे.


राजन महाजन
- ३ ऑगस्ट २०१०

Wednesday, July 28, 2010

काही सुचत नाही


लिहावे अस वाटत, पण शब्द सुचत नाही
मनात खूप येत, पण कागदावर उतरत नाही.
सर्व तुंबून राहते, मन मोकळे होत नाही
दोन ओळी लिहिल्या की आनंदाला सीमा राहत नाही.

Monday, July 12, 2010

हरा नाहीतर मरा


हरा नाहीतर मरा

फुटबॉल विश्वचषक संपला. जेतेपद स्पेनने पटकावले. सर्व संघ जिंकायचेच या इर्शेने खेळत होते. त्याच इर्शेने सर्व वाहिन्या खेळाच्या बातम्या सातत्याने दाखवत होत्या. या बातम्यांमधील एक बातमी ठळकपणे माझ्या लक्षात राहिली. कारण कोणताही संघ जेव्हा खेळतो (कोणताही खेळ) तेव्हा त्यामागचा उद्देश असतो जिंकणे, येनकेन प्रकारेण. फक्त सिनेमामध्ये या खेळाचा उद्देश वेगळा असु शकतो. उदा. लगानमध्ये क्रिकेटचा सामना जिंकल्यावर शेतसारा माफ होतो. ही बातमी पाहण्याच्या आधी जर मला कोणी सांगितले असते की जिंकण्याचा उद्देश हा आपल्या प्राणाची तमा न बाळगता, जिंकल्यावर आपला मृत्यू होऊ शकतो हे माहीत असूनही, राष्ट्रप्रेमाखातर जिंकणे आणि प्राणाची आहुती देणे, हा असु शकतो, तर माझा विश्वास कदापि बसला नसता. पण अशी घटना घडलेली आहे, १९४२ साली.

युक्रेनमध्ये फुटबॉल हा खेळ प्रसिद्धीस येत होता. त्यांचा Dynamo Kiev हा संघ अत्यंत बलवान मानला जाई, या संघाने राज्य पातळीवर चांगला खेळ केला होता. १९४१ मध्ये नाझी सैन्याने त्यावेळच्या युक्रेनवर हल्ला केला. युद्धाच्या धामधुमीत संघाची वाताहत झाली, खेळाडू सैनिक म्हणून युद्धात सहभागी झाले. Kiev शहरावर नाझी सैन्याने कब्जा मिळवला आणि काही खेळाडू युद्धकैदी झाले.

Dynamo Kiev चा गोल कीपर, Nikolai Trusevich,

नाझिनी ताबा घेतलेल्या Kiev मधे एका बेकरीमध्ये कामाला लागला. बेकरी मालक फुटबॉल फॅन होता. त्याच्या पुढाकाराने, त्याने इतर खेळाडूंची जमवाजमव करून, FC Start हा संघ चालू केला. त्यात ८ खेळाडू Dynamo Kiev चे होते. ह्या संघाचा सामना, सैन्यातील वेगवेगळ्या देशांच्या संघांशी झाला. त्यानी हंगेरीचा संघ, रोमानियाचा संघ, जर्मनी चा संघ अशा एकंदरीत सात संघांचा पराभव केला तेही योग्य साहित्य, आहार आणि परिस्थिती नसताना. युद्धात पराभूत झालेल्या Kiev मधील संघ, विजयी सैन्याला फुटबॉल मधे हरवू लागला. यामुळे खेळात पराभूत होणार्‍या सैन्याचे मनोबल खच्ची होऊ नये आणि युद्धात पराभूत Kiev नागरिकांचे मनोबल उंचावू नये म्हणून नाझी सैन्याने FC Start संघाचा सामना जर्मनीचा बलाढ्य संघ Flakelf शी आयोजित केला.

मुख्य सामन्याआधी झालेल्या सराव सामन्यामध्ये FC Start ने Flakelf संघाचा ५ – १ ने पराभव केला. मुख्य सामन्याची तारीख ठरली ९ ऑगस्ट १९४२. नाझी सैन्यातील अधिकार्‍याची रेफ्री म्हणून नेमणूक झाली जेणेकरून Flakelf संघाचा जिंकण्याचा मार्ग सुकर व्हावा. सामन्या दरम्यान FC Start खेळाडूना धमकी देण्यात आली की जर तुम्ही सामना जिंकलात तर त्याचे परिणाम चांगले होणार नाहीत आणि हरणेच तुमच्या फायद्याचे आहे.

Flakelf संघाने सुरुवाती पासून FC Start संघाच्या खेळाडूंवर ह्ल्ला सुरू केला. बॉल पेक्षा जास्त ते खेळाडूना लाथा मारू लागले, त्याना पाडू लागले. पण त्यांच्या सर्वा फौल्सकडे रेफ्रीने दुर्लक्ष केले. FC Start च्या गोलकीपरच्या ,Nikolai Trusevich, डोक्यात दोन वेळा लाथा मारण्यात आल्या पण रेफ्रीने त्याकडे लक्ष दिले नाही. FC Start ने Flakelf संघाच्या हिंसक खेळा विरुद्ध वेळोवेळी अपील केले पण रेफ्री ने त्यांचे काहीही ऐकायचे नाही असे ठाम ठरवले होते. अशा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये, दहशतीला/ हिंसेला न घाबरता, जीवाची पर्वा न करता, FC Startच्या खेळाडूनी आपला लाजवाब नैसर्गिक खेळ केला आणि Flakelf ला ५ – ३ ने हरवले. त्या ९० मिनिटांमध्ये त्या खेळाडूंची मानसिक स्थिती काय असेल याची नुसती कल्पना केली तरी माझ्या अंगावर काटा उठतो.

सामन्यानंतर काही दिवसांनी FC Start च्या सर्वा खेळाडूना एकेक करून काही ना काही कारणानी अटक करून त्यांची रवानगी नाझी छ्ळ छावणीमध्ये करण्यात आली. संघाचा कॅप्टन Nikolai Trusevich,Kuzmenko, Klimenko याना गोळी घालण्यात आली. Nikolai Korotkykh आणि २/३ जणांचा छ्ळ छावणीमध्ये झालेला अमानुष छ्ळ सहन न झाल्याने मृत्यू झला. या संघामाधील मोजकेचजण या छ्ळछावणीमधून युद्धानंतर सुटले. नक्की कोण आणि किती मेले या बाबत नेटवर वेगवेगळी माहिती आहे.

या खेळाडूंच्या स्मरणार्थ हा मृत्यूचा सामना ज्या झेनीट स्टेडियममधे खेळला गेला तिथे एक स्मारक उभारण्यात आले. युक्रेन मध्ये आजही या शूर खेळाडूंची वीरगाथा गायली जाते. Dynamo Kiev या संघातील खेळाडूचे लग्न झाले की पत्निसहित या स्माराकाशी आदरांजली वाहण्याची प्रथा इथे पाळली जाते.

अधिक माहितीसाठी ही लिंक पहा http://www.berdichev.org/the_death_match.html

-राजन महाजन
१२ जुलै २०१०

Sunday, July 4, 2010

ब्रेकिंग न्यूज़

ब्रेकिंग न्यूज़  

सर्व न्यूज़ वाहिन्यांची नुसती धांदल चालू असते. प्रत्येक बातमी ही आपल्याच वाहिनीवर सर्वात प्रथम दिसली पाहिजे असा त्यांचा अट्टाहास असतो. आणि तसे झाले नाही की खोटे खोटे...."देखिए ये खबर सबसे पहीले हमारे चानेलपर" असा अविर्भाव आणून लोकाना मुर्ख बनवायचे.

प्रत्येक चॅनेलवर एकाच वेळेस किमान ३/४ बातम्या दिल्या जातात. बातम्या देणारा एक बातमी देत असतो. त्याच्या डोक्यावर एक पट्टी असते तिथे वेगळेच काहीतरी चालू असते. त्याच्या अंगाखाली (पडद्याच्याखाली) दोन पट्ट्यानवर दोन वेगवेगळ्या बातम्या सुरू असतात. कधी कधी २ च पट्ट्या असतात. Just In , Whats making news, Whats New, News Flash, Breaking News, दिवसभरात, साधारण अशी नावे त्यांना असतात. जेव्हा आपण चॅनेल सरफिंग करतो आणि अशा बातम्या एकदम वाचल्या जातात तेव्हा मजा येते. त्या तिन्ही पट्ट्यानवरील बातम्यांचा एकमेकांशी काहीही संबंध नसतो पण जर आपण तो जोडला तर घटकाभर करमणूक नक्की होऊ शकते. करून पहा. पुराव्यानी शाबित करतो.


MS Dhoni is Engaged
CM Ashok Chavan gives a warning

-----------------------

महिनदरसिंग धोनी की छोटिसी प्रेम कहानी
रैना, आर पी, चावला, रोहित भी शामिल

----------------------

आईमुळेच चांगली शिकवण मिळाली
१५ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश

----------------------

महेंद्रसिंग धोनीचा साखरपुडा
भाजपाचा भारत बंदचा इशारा
महाराष्ट्रशासनाचे प्रतिबंधात्मक उपाय

----------------------

अभिषेक - रावण अच्छी फिल्म है
वो कर रहा है सबसे धोका

----------------------

राखी सावंत बिग बॉस से बाहर
मुंबई है परेशान

----------------------

Sharad Pawar new ICC President
Lingerie Model vows to strip


- राजन महाजन
५ जुलै २०१०

Thursday, July 1, 2010

थोतांड


बरेच दिवस हा विषय डोक्यात घोळत होता, लिहायला मुहूर्त सापडत नव्हता. पुन्हा एक वीडियो टीवीवर पहिला आणि आता लिहील्याशिवाय राहावत नाहीये.

त्यात दाखवले होते - रायबरेली येथे एक बाबा लहान मुलांचे रोग बरे करण्यासाठी येणार्‍या लोकाना मुलांना गटरच्या पाण्यात आंघोळ घालण्याचा सल्ला देत होता आणि लोक त्यांच्या वर्षा - दोन वर्षांच्या मुलांना त्या पाण्यात नखशिखांत न्हाऊ घालत होती. मुले ओरडत, रडत होती पण अंधश्रद्द आई-वडिलांना कसलेही भान नव्हते. त्या मुलांच्या आरोग्याला हानिकारक गोष्ट आपण करत आहोत याची जाणीव त्याना नव्हती. या पाण्यामुळे त्याना बरे करण्याऐवजी भयंकर किटाणूंच्या स्वाधीन करत आहोत हे त्यांच्या गावीही नव्हते. त्या बाबापेक्षा मला या लोकांचा जास्त राग आला. स्वत:हून खड्ड्यात जाण्यासारखे होते हे. अडाणी लोकच हे करू शकतात असे मात्र नाही. चांगले शिकले-सवरलेले लोकही अशा बाबांच्या जाळ्यात अडकतात.
बर्‍याच बाबांच्या लीला वेळोवेळी उघडकीस आल्या आहेत. कित्येक बाबांवर गंभीर आरोप झालेले आहेत, कित्येकानी तुरुंगाची हवा खाल्लेली आहे. अगदी अलीकडचे उदाहरण म्हणजे स्वामी नित्यानंद. यांच्या काम क्रिडानचे वीडियो यू-ट्यूब वर उपलब्ध आहेत. स्वामीबद्दल बरेच छापुन आलेय, टीवीवरही बरेच दाखवण्यात आलेय. नुकतीच त्यांची तुरुंगातून सुटका झाली. मग त्यानी पश्चात्तापाचे नाटक केले.

काही महिन्यांपुर्वी "इच्छाधारी संत स्वामी भीमनंद्जी महाराज चित्रकूटवाले" अशा लांबलचक नावाच्या बाबाचा पर्दाफाश झाला. बाबा वेश्या पुरविण्याचे काम करायचे असे उघडकीस आले. बर्‍याच शहरात त्याचे जाळे पसरले होते. त्यातून त्याने ५०० कोटीची माया जमवल्याचा आरोप आहे. या लिंक पहा -

आसारामबापु हे मोठे प्रस्थ आहे. त्यांच्या आश्रमात एका महिन्यात ४ मुलांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे त्यांच्याभोवती संशयाचे वातावरण निर्माण होऊन ते गोत्यात आले. अजूनही काही प्रकरणांमधे ते अडकले आहेत. काही जमीन बळकावल्याच्या केसेस आहेत, काही फसवणुकीच्या. http://www.indianexpress.com/news/cult-&-controversy-the-story-of-asaram-ashr/347163/ मध्यंतरी तर त्यांनी पोलिसाना आव्हान दिले की हिंमत असेल तर मला अटक करून दाखवा.

सत्य साईबाबा ह्यांचे अनेक राजकीय नेते, उद्योजक, तारे-तारका भक्त आहेत. पण तेही वादांपासून दूर राहू शकलेले नाहीत. त्यांचे चमत्कार हे कोणीही साधारण जादुगार करू शकतो असे जादुगारांचे म्हणणे आहे. अलाहाबाद येथील प्रा. नायर यानी सत्य साईबाबाना आव्हान दिले आहे की तुमचे सारे चमत्कार मी करू शकतो...तुम्ही खरच बाबा असाल, तुमच्या मधे दैवी शक्ति असेल तर मी सांगतो ते करून दाखवा. यू-ट्यूब वरदेखील
http://www.youtube.com/watch?v=hWomaejpSkg बाबांचे चमत्कार हे निव्वळ हातचलाखी आहे हे दर्शवणारे असंख्य वीडियो आहेत. तसेच त्यांच्यावर आरोप करणारे, त्यांच्या विरोधात बरेचसे लिहिले गेले आहे. हे दोन ब्लॉग्स मला सापडले. http://saibabaexposed.blogspot.com/2002/07/sai-baba-shiva-or-sadhaka.html , http://exposedsaibaba.blogspot.com/2009/05/expose-of-fraud.html

बंगलोरच्या जवळ सत्य साईबाबा सारखा दिसणारा सिव साई बाबा आहे. हा बाबा कमी आणि गारुडी जास्त वाटतो. याचे सापाबरोबरचे वाहयात चाळे पहा. http://www.youtube.com/watch?v=cmeY6likhOs

श्री श्री रवि शंकर यांच्या आश्रमात काय गोंधळ झाला....बाबांचे म्हणणे की मला मारण्यासाठी गोळीबार झाला पण अध्यात्माचे कवच आश्रामाभोवती असल्याने कोणालाच काहीही इजा पोहचली नाही. तपासात असे निश्पन्न झाले की कुत्री हकलण्यासाठी केलेला तो गोळीबार होता. केवढा मोठा पोपट झाला.

थप्पड़ बाबाचा हा वीडियो पाहाच. http://www.youtube.com/watch?v=aGag2lZlKlM असे वाटते की जीव घ्यावा ह्याचा. हा बाबा १५/१६ वर्षाचा आहे. लहान मुलांच्या अंगावर काय उभा राहतो, त्याना उचलून फेकून देतो, मारतो. त्यांच्यावर उपचार करण्याच्या नावाखाली काय वाट्टेल तो गोंधळ घालतो. याची उपचार पद्धती हिंसकच आहे. छातित लाथ मारणे, पाठीत लाथ मारणे, मान मुरगळणे, हात मुरगळणे.

ठोककुडू बाबा, बोलेन बाबा, पाइलट बाबा, कमलीवाले बाबा,कर्नालचा पानीवाला बाबा अश्या बर्‍याच बाबांचे प्रताप internet वर उपलब्ध आहेत. टीवीवर सुद्धा यांचे फसवणुकीचे प्रकार सतत दाखवत असतात. तरीही लोकांचे डोळे उघडत नाहीत, (की ते मुद्दाम डोळेझाक करतात).

बाबांचे पीक येतच राहते आणि त्याना भक्तगण मिळताच रहातात. बाबा होणे हा सध्याचा सर्वात किफायतशीर धंदा झालेला आहे. अशा बाबा, बापू, भगवान, महाराज, अवतार, अम्मा, माता ई. लोकांच्या मागे लागण्याची गरज का निर्माण होत असेल ? हा प्रश्न मला सारखा भेडसावत राहतो.

- राजन महाजन
२ जुलै २०१०


Thursday, June 24, 2010

तेवढ्यात










ही कविता साधारण एक वर्षापूर्वी लिहिलेली आहे. Orkutवर अपलोड केली होती. ती ब्लॉगवर आणत आहे म्हणजे सर्वाना आनंद घेता येईल.

राजन महाजन

Tuesday, June 22, 2010

भिकार दिवस


भरवश्याच्या म्हशीला टोणगा, दुष्काळात तेरावा महिना, तोंड दाबून बुक्क्यांचा मार, आभाळ फाटल्यावर ठिगळ कुठे कुठे लावणार ? या सार्‍या म्हणिंची प्रचीती एका दिवसात आली तर काय अवस्था होईल ? अगदी तशीच अवस्था माझी झाली . काही दिवसच असे असतात, पार करून टाकतात. एकही गोष्ट सरळ होत नाही. मनासारखे काहीही घडत नाही. दिवस खराब जातो. अत्यंत भिकारडा दिवस म्हणून त्याची नोंद आयुष्याच्या पटावर होते.

मागच्याच आठवड्यातील गोष्ट. नागपूरच्या फ्लाइट मरायला एकदम सकाळी सकाळी आहेत. वेळेत पोहोचायचे म्हणजे भल्या पहाटे उठावे लागते. शिरस्त्याप्रमाणे मी मेरु बुक करू म्हटले तर बुकिंग डिनाइड असे उत्तर मिळाले. या चक्करमुळे सकाळ अर्धा-पाऊण तास आधी सुरू झाली २ bags आणि मी अशी वरात रस्त्यावर आली. रिक्षाच मिळेना. TMT ची बस आली त्यानी तीन हात नाक्याला उतरलो. समोरच टॅक्सी पाहून धन्य झालो. टॅक्सीत शिरलो. मीटर झाकलेले आढळले, चौकशीनंतर कळले की meterमध्ये काही प्रॉब्लेम नाही ….उगाचच झाकून ठेवलेय. कांजूरमार्गला पोहोचलो तरी मीटर काही पुढे सरकेना, साडेसतरावरच ठिय्या मांडून बसले होते. सावध होऊन पुन्हा चौकशी केली. उत्तर मिळाले – "साहब, समझके दे देना". आता माझी समज, त्याची समज जुळायची म्हणजे कटकटीचे काम. विमानतळावर पोहोचल्यावर, आमची समज जुळून एकाच आकड्यावर यायला आम्हाला बरेच विचार मंथन आणि चर्चा करावी लागली.

विमान उडायला १ तासाहून जास्त उशीर झाला . सकाळचे सर्व परिश्रम मला हसत होते. Air Hostess पेक्षा "हवाई सुंदरी" हा शब्द बरोबर आहे, असे माझे मत आहे. कारण त्यांच्याकडे पाहत - पाहत बारा वेळ जातो . त्याही ramp वर चालल्यासारख्या Aisle मध्ये फिरत असतात . पण या Air-India च्या विमानात हवाई बंदर होता . मिशीचेही केस कलप लावून काळे केलेला बाप्या नशिबी आला.
नागपूर विमानतळावर माझी bag रडत -खडत सर्वात शेवटी आली , बहुदा तिचीही इच्छा नसावी इथे येण्याची. बाहेर पडलो “Mr. Mahajan” नावाचा फलक घेऊन एक जण उभा. त्याला सांगितले कि मी महाजन. अभिजित Group मधून आलास का ? नाही म्हणाला. मग “गायत्री हॉटेल" मधून आलास का ? नाही म्हणाला. अकबर Travels मधून आलोय, 'गोमती इन' मध्ये जायचे आहे, म्हणाला. मी विचार केला कि दुसऱ्या महाजनसाठी आला असेल. मी माझ्या गाडीसाठी शोधाशोध केली, तर गाडीच नाही . थोडी फोनाफोनी झाल्यावर , समजले कि तो गधा माझ्यासाठीच आला होता. 'गायत्री इन' ऐवजी 'गोमती इन' करत होता .
विलंबित विमान सेवा , pick-up चा गोंधळ आणि हॉटेलात जाऊन अंघोळ- पांघोळ करून निघे पर्यंत चांगलाच उशीर झाला . रिक्षाने ऑफिसला निघालो . नागपुरातील रिक्षा म्हणजे एक दिव्य आहे. बऱ्याच रिक्षांची परिस्थिती वाईट आहे . रिक्षाचा फायदा एवढाच कि चालावे लागत नाही , वेळ वाचेलच याची खात्री नसते . आपल्याकडे शाळेतल्या मुलांसाठी असलेल्या रिक्षांना , चालकाच्या पाठीला चिकटून एक पट्टी असते तशी पट्टी इथे जवळ जवळ सर्व रिक्षांना आहे. हे रिक्षा पुराण अशासाठी की रिक्षातून उतरताना पट्टीच्या लोखंडी कडेने माझ्या Pant चे चुंबन घेतले, माझ्या Pantनेही चटकन या प्रेमाला प्रतिसाद दिला वा दोघांनी मिळून मला उघडे पडले. तसाच परत हॉटेलवर जाऊन Pant बदलून ऑफिसात गेलो.

मग ऑफिसातील कटकटी हात धुवून मागे लागल्या. कामे आटपता-आटपता उशीर झाला. ऑफिसची गाडी चुकली. नाइलाजाने परत रिक्षात घुसलो. रिक्षाला पावसाळ्याचे पडदे लावणे इथे कमीपणाचे मानतात. पाऊस पडून गेला होता, सीट ओली होती आणि फाटकिही. ( २५ सीट फाटलेल्या रिक्षामागे, १ सीट न फाटलेली रिक्षा ; असे प्रमाण नागपुरात आहे. क्वचित ती १ रिक्षा वाट्याला येते ) हॉटेलात पोहोचेपर्यंत पार्श्वभाग चिंब भिजला होता.

झोपेपर्यंत अजुन काय काय झेलावे लागणार अशी धाकधुक मनात होती. पण बचावलो. “ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असो द्यावे समाधान” असा विचार आणि येणारा दिवस सरस असु दे अशी देवाकडे प्रार्थना करत झोपी गेलो.

- राजन महाजन
२२ जून २०१०