Wednesday, February 19, 2014

चीनी कम चाय

मैत्री म्हणजे नक्की काय ?
नाही नुसतेच 'हाय' नी 'बाय',
मित्रांशिवाय जिंदगी म्हणजे,
चीनी कम चाय .

राजन महाजन
५/२/२०१४

तुझ्या आठवणीने

तू स्वप्नात येता,
मन होई प्रसन्न,
पण तुझ्या आठवणीने,
ना झोप येई, ना स्वप्न.

राजन महाजन
५/२/२०१४

कुणी आहे का ?

प्रेम वाटायलाच बसलोय मी,
घ्यायला कुणी आहे का ?
मिठी माझी तयारच आहे,
यायला कुणी आहे का ?

राजन महाजन
५/२/२०१४

येशील तू

स्वप्नात येशील तू
वाट पाहिली सकाळपर्यंत
आली नाहीस तू
परत झोपलो दुपारपर्यंत

राजन महाजन 
५/२/२०१४

कट्टी बट्टी

कट्टी बट्टी चे वय केव्हाच सरले,
ओपिंगो बैटींगोचे दिवसही मागे पडले,
आयुष्याच्या घाण्याला सर्व जुंपले,
मैत्रीचे बंध मात्र तसेच राहिले.

राजन महाजन ५/२/२०१४

खेळ चारोळ्यांचा

मिळूनी खेळलो खेळ चारोळ्यांचा,
हार जितीला दर्जा दुय्यमतेचा,
घेऊ आनंद काव्य रसाचा,
मित्र मैत्रिणींच्या सहवासाचा ।

राजन महाजन 
६/२/२०१४

सोबत

तू सोबत आहेस,
घट्ट आहे वीण संसाराची,
तू नसशील जेव्हा,
विसकटेल घडी आयुष्याची

राजन महाजन
१०/२/२०१४

संत वचन

सृष्टीमध्ये बहुजन,
नाही सर्व एकसमान ।
करुनिया विचार,
निवडावे महाजन ।।

राजन महाजन
३१/१/२०१४



विश्वामित्र - मेनका

विश्वामित्र ऋषी थोर,
केली तपश्चर्या घनघोर,
देवांना लागला घोर,
करो लागले विचार,
सापडला उपाय सुंदर,
मेनके धाडीले भूवर,
मेनका मोठी चतुर,
त्रिभुवनी सर्वात सुंदर,
करुनी क्रीडा कामुक,
केले विश्वामित्रा आतुर,
जाहले दोघांचे मिलन,
तपश्चर्या झाली भंग,
साधला देवांचा कार्यभाग,
ऐका ही कहाणी सज्जन,
सांगी राजन महाजन,
काय शिकशील यातून ?
आपुले हाती नाही मन.

१३/२/२०१४

टोलच टोल

इकडे तिकडे चोहीकडे,
टोलच टोल सगळीकडे ।

पडती रस्त्यांवर खड्डे,
वाट शोधण्या धांदल उडे,
पब्लिक बिचारे रोज रडे,
नेत्यांची मग मौज घडे,
आंदोलनांची राळ उडे,
खंडणीचे अवजार सापडे,
सेटलमेंट नंतर….
आनंदी आनंद गडे,

इकडे तिकडे चोहीकडे,
टोलच टोल सगळीकडे ।

राजन महाजन
१२/२/२०१४  

वालेंटाईन दिवस

आज म्हणे वालेंटाईन दिवस,
घालावा प्रेमाचा हैदोस 
मला वाटे हे सर्व भंकस 
प्रेमासाठी, फक्त एकाच दिवस ?

जर झाले आज भांडण,
झाली थोडी तणतण,
तरी काय आपण,
वर्षभर करावी वणवण ?

प्रेमाला बांधू नये एक दिवसात,
शोधावे प्रेम प्रत्येक क्षणात,
असते प्रेम दोन मनात,
घेऊन कशाला जावे जनात ?

राजन महाजन 
१४/०२/२०१४ 

Thursday, February 13, 2014

' किस ' डे

दिसता सुंदर रुपडे,
वदावे… आज 'किस'डे,
काढी जर ते जोडे,
पळावे तत्क्षणी बापुडे ।


राजन महाजन
१३ फेब्रुवारी २०१४ 

Wednesday, February 12, 2014

Need


smile on your face,
twinkle in your eyes,
what more I need in life,
to survive.

rajan mahajan
5 Feb 2014 

असे होऊ आम्ही


असे होऊ आम्ही, कधी न वाटले,
करामती बघून, आई बाबांनी हात टेकले,
शाळेत तर, नर्मदेतील गोटे म्हणून हिणवले,
जबाबदारी … जबाबदारीने आम्हाला सर्व शिकवले,
या जगात भले काय ? बुरे काय ? सर्व समजावाले,
आज…. या वळणावर, आहोत आम्ही पाय रोवुनी उभे,
किंचित का असेना ? सिद्ध स्वत:ला करून दाखवले. 

राजन महाजन 
२९ जानेवारी २०१४ 


फाटक नशीब

साल…आपलं नशीबच फाटक, 
प्रत्येक पोरीने आपलं नावच टाकलं ।
प्रत्येकीकडे आपण प्रेमाने पाहिलं,  
प्रत्येकीने सालं थोबाडच फिरवलं ।।

राजन महाजन 
5.2.2014

दारुड्याची प्रेम चारोळी


तुझ्या मिठीत असा विरघळतो,
व्हिस्कीमध्ये जसा सोडा मिसळतो,
तुझी नशा सर्वांगाला शॉट देते,
तू जवळ असता कशाला बाटली लागते ?


राजन महाजन 
5.2.2014

तनहाईयाँ

ये तनहाईयाँ, 
मार देती हमें, 
अगर तेरी यादों का,  
सहारा न होता।  

राजन महाजन 
५ फरवरी २०१४ 

my child

first time when I saw you my child,

all the worries were left behind,

you brought only wonderful moments to my life,

giving you the best is the aim, for which I strive.  


Rajan Mahajan
5th Feb 2014



दोन ओळी

दोन ओळी प्रेमाच्या, 
दोन ओळी मैत्रीच्या ।
पूर्ण झाली माझ्या, 
जीवनाची कविता  ।।

राजन महाजन 
५ फेब्रुवारी २०१४ 




प्रेमाच्या दोन ओळी, 
मैत्रीच्या दोन ओळी ।
लिहून करतो पूर्ण,  
जीवनाची चारोळी ।।

राजन महाजन 
५ फेब्रुवारी २०१४ 

मनमोहिनी

नको उचलूस भाता नाजूक हातांनी, नजरेचे बाण दे या हृदयात ठेवुनी ।
नको लावुस काजळ रेखीव डोळ्यांतुनी, ठेव ती जागा मजसाठी राखुनी ।।
नको फिरवूस लाली ओठांवरुनी, घे रंग प्रेमाचा या ओठांमधुनी ।
नको सोडुस हात हा मनमोहिनी, घे प्रेम हवे जे मजकडुनी ।।

राजन महाजन 
५ फेब्रुवारी २०१४

अंकुर

परिस्थितीने उठले जीवनात काहूर, 
नैराश्यात 'नित्याने' फुलविला आशेचा अंकुर । 
तिच्या प्रेमात न्हाऊन निघालो पुरेपूर,
सहवासाने तिच्या झाली सर्व दु:ख्खे दूर ।।

राजन महाजन 
५ फेब्रुवारी २०१४    

काय कमावलेस ?

काय कमावलेस ? विचारले देवाने,
दाखवले त्यास मित्र, अभिमानाने ।
ऐश्वर्यामागे नाही दवडली, सनामागुन सने,
जीवन जगलो, जोडण्यात मनामागून मने ।। 

राजन महाजन 
३ फेब्रुवारी २०१४

खो-खो

श्रेया आणि संघासाठी - 

खो-खो खेळ मर्दानी, 
खेळीला जातो घाम गाळुनी,
मैदानावरील जणू या सौदामिनी,
त्याना सलाम आम्हा सर्वांकडुनी.    

राजन महाजन 
३१ जानेवारी २०१४  

खेळ चारोळ्यांचा

सर्व खेळू हा खेळ चारोळ्यांचा,  
हार जीतीला दर्जा दुय्यमतेचा, 
घेऊ आनंद काव्य रसाचा, 
एकमेकांच्या सहवासाचा.

राजन महाजन 
५ फेब्रुवारी २०१४ 

Tuesday, February 11, 2014

दान नशीबाचे


प्रेम नाही काम येरा गबाळ्याचे,  
घोडे अडले येथे भल्याभल्यांचे ।
पदरी ज्यांच्या दान नशीबाचे, 
त्यांनाच गवसले बंध प्रेमाचे ।।

राजन महाजन 
५ फेब्रुवारी २०१४