Thursday, April 1, 2010

Tour De Vizag

काही कामानिमित्त VIshakapatanam ला जावे लागले. काम झालेच पण त्यानिमित्ताने vishakapatanam आणि आजूबाजूचा परिसर पाहण्याचा योग आला.  



त्यावर हे फोटो फीचर (फोटो मोठा करण्यासाठी त्यावर क्लिक करा)
माझे मित्र ए. एस. राव यांच्याबरोबर कैलासगिरी या टेकडीवर फिरायला गेलो. या टेकडीवर जाण्यास गाडीरस्ता आहे, केबल कार आहे आणि चालतहि जाता येते. टेकडीवर शिव -पार्वतीच्या मूर्ती आहेत,

बाग आहे. येथले वैशिष्ट्य म्हणजे येथून होणारे समुद्र आणि Vizag शहर दर्शन.
Vishakapatanam ची चौपाटी म्हणजे R K (राम कृष्ण परमहंस ) बीच. लांबच -लांब पसरलेला हा समुद्रकिनारा अवश्य भेट देण्यासारखा आहे. A drive along the Beach is an experience. 'एक दुजे के लिये' चित्रपटाचे चित्रीकरण गोवा नव्हे तर या बीचवर झालेय अशी माहिती मिळाली.
या बीचवर दक्षिण -पूर्व आशियामधील प्रथम पाणबुडी (Sub-Marine) संग्रहालय आहे . हि पाणबुडी (INS Kursura)समुद्रातून खेचून किनार्यावर आणण्यासाठी आणि संग्रहालयामध्ये बदलण्यासाठी सहा कोटी रुपये आणि दीड वर्षे लागली . पाणबुडीमध्ये राहणारे सैनिक पाण्याच्या तुटवड्यामुळे ६० दिवस अंघोळ करत नाहीत आणि १०० च्यावर लोकांसाठी २ संडास असतात. पाणबुडीमधील आयुष्य आणि पाणबुडीबद्दल सर्व माहिती या संग्रहालयामध्ये मिळते . पाणबुडीमधील महत्वाचे भाग Battery, Valves, Torpedo इत्यादी बाहेर मांडून ठेवलेत व त्याबाबत माहिती फलक आहेत.

R K बीचच्या दक्षिणेस एक टेकडी आहे तिच्या आकारामुळे तिला नाव पडले आहे, Dolphin’s Nose. या Dolphin’s Nose वर आहे दीपस्तंभ ! अवश्य भेट देण्यासारखी जागा. दिपास्ताम्भावरून Vishakapatanam बंदर , Naval Dockyard, R K बीच हा सारा परिसर दृष्टीस पडतो.

Vishakapatanam ला येऊन बोर्रा गुंफा (Borra Caves) पाहणे एकदम MUST आहे. अंदाजे १०० कि.मी. प्रवास करून मी Borra Caves ला पोहोचलो. प्रवासातील मजेशीर भाग होता “अम्मावारुलू ”.


“अम्मावारुलू ” म्हणजे देवीसाठी दान . ते गोळा करायची पद्धत काय ? तर कोणीही (सर्रास कोणीही, लहान मुले , बायका , पुरुष ) रस्त्यात बांबू टाकून रस्ता अडवलेला …१ रुपया दिला कि बांबू वर करणार आणि मगच गाडी जाऊ शकते. मी त्याला नाव दिले “Tribal Toll” कारण toll वसूल करणारे त्या भागातील आदिवासी होते. शेवटच्या २०/३० कि.मी. मध्ये किमान १५ ठिकाणी “Tribal Toll” दिला.

Borra caves हा एक अचाट प्रकार आहे . सह्याद्रीतील गुहा मानवनिर्मित आहेत . Borra caves निसर्गनिर्मित आहेत . सह्याद्रीतील गुहा साधारण १०० पटींनी मोठी केली तर जे होईल ते म्हणजे Borra Caves. या गुंफांची लांबी 200 मीटर आहे पण चाल (वेडीवाकडी) ३५० मीटर आहे. येथून गोस्थानी नदी , जी vizag शहराला पाणी पुरवते , ती उगम पावते . Borra Caves चे वैशिष्ट्य म्हणजे बारमाही पाण्याचा चुनखडी दगडांवर झालेल्या प्रक्रियेतून (१५ कोटी वर्षे हि प्रक्रिया सुरु आहे ) निर्माण झालेले विविध आकार. हा प्रकार प्रत्यक्ष पाहण्या व अनुभवण्यासारखा आहे . ज्या फोटोत माहिती आहे तो आधी वाचला तर पुढील फोटोत काय आहे याची कल्पना येईल .

Stalagmite and Stalactite म्हणजे काय ते वाचण्यासाठी हि link पहा http://en.wikipedia.org/wiki/Stalagmite. या विविध आकारामध्ये Guide साईबाबा , शंकर , पार्वती , कार्तिकेय , गणपती असेही आकार दाखवतो पण ते पाहून विसरून जायचे . मला भावले ते छतावरील झुम्बाराचा आकार आणि मेंदू सदृश्य आकार.


अरुकुच्या वाटेवर थातीपुडी जलाशय आहे, तोही पाहून आलो.


या शहरात व ज्या भागात फिरलो तिथे एकही हिंदी सिनेमाचे पोस्टर पाहिले नाही.
तेलगु सिनेमाची पोस्टर सर्वत्र दिसली त्यावर हिंदीतील दीपिका, भूमिका दिसल्या.
एका भागात मोहिनी, मिनी मोहिनी, मोहिनी ३५ MM , कन्या, श्रीकन्या, लक्ष्मी, लक्ष्मीकांत अशी बरीच चित्रपटगृहे आहेत आणि सर्व ठिकाणी तेलगु चित्रपट जोरदार चालू होते. इतर भाषांवरील त्यांचे प्रेम खालील फोटोमध्ये आढळेल.

मी पाहू न शकलेल्या गोष्टी –

अरुकू – थंड हवेचे ठिकाण (अरुकुच्या वाटेवर Borra Caves आहेत )
भिमली – A former Dutch Settlement. R K बीचपासून उत्तरेस 20 कि.मी.
सिम्हाचलम – वराह लक्ष्मीचे जागृत देवस्थान.

Recommended Food Joints in Vizag -

Earthen Oven - 47-10-34 & 35,Dwarakanagar Diamond Park,Sreekanya Road (Buffet Lunch/dinner – Rs. 350/-)
Orange Hotel - 30-14-9, Saraswati Park, Dabagardens (Buffet Lunch/dinner – Rs. 200/-)
Murugan Idli Shop - Seven Hills Junction (south Indian Meals & Snacks)
Pastry Coffee 'n' Conversation - Siripuram (Place to relax & chill)

- राजन महाजन
२ एप्रिल २०१०
टीप - Vishakapatanamमध्ये मी २५ मार्च ते ३१ मार्च होतो.