Friday, February 26, 2010

चुत्या बनवायची लाईन

एक मेल आला. नुकत्याच चालू झालेल्या trekking (?) company कडून. ३ दिवस , ३ / ४ किल्ल्यांना भेटी. पैसे किती ? तर १५००. प्रवास ट्रेन / S T ने , सोबत आणायच्या गोष्टींमध्ये १ packed lunch, ४ कांदे , 5 टोमाटो , 5 बटाटे , 300 gm तांदूळ , 300 gm डाळ , 2 मेणबत्त्या , 2 काकड्या , 2 गाजरे... असेही आणायचे होते. मला प्रश्न पडला कि मग १५०० रुपये घेऊन हि company देणार काय ? देवाला ठाऊक.
  
अशीच अजून १ company आहे. तिचे कार्यक्रम जोरात चालू असतात , त्यांना बकरेही नित्य -नेमाने मिळतात . हे लोक नक्की काय करतात हे पाहण्यासाठी मी ३/४ वर्षांपूर्वी त्यांच्याबरोबर माहुलीला गेलो. पदरचे ८५० खर्च करून, दीड दिवसांचा हा प्रोग्राम केला. प्रवास mini – bus ने झाला. राहण्याची सोय तंबूमध्ये केली होती. रात्रीचे जेवण, सोबत नेले होते तेच खाल्ले. माहुलीला चढायला सुरुवात केली तेव्हा, कंपनीचे expert adventure guides….गावापासूनच seat harness चढवून आणि rope coils गळ्यात लटकावून निघाले. मी “एवढी equipments कशाला ?” म्हणून चौकशी केली. उत्तर मिळाले कि पुढे rock patch आहे . यांना हसावे कि रडावे मला कळेच ना ? किल्ल्याच्या ऐतिहासिक माहितीबद्दल सगळी बोंबाबोंब होती. किल्ला संपूर्ण पाहायचा असतो …याची हि त्यांना कल्पना नव्हती. आम्हाला खाज म्हणून २ /३ जण पूर्ण किल्ला पाहून आलो . असा एकंदरीत अंदाधुंदी कारभार चालू होता.

सध्या अश्या trekking कंपन्यांचे पीक आलेय. जो उठतो तो काही तरी कंपनी / संस्था काढतो आणि लुटालुट चालू . अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले बरेचजण ५ /१० ट्रेक केले कि आपण leader म्हणून सक्षम आहोत असे समजायला लागतात. पण leader म्हणून काय काय गोष्टी आवश्यक आहेत ? उदा. Rope management, first aid skills, physical fitness, mental fitness, effective communication, disaster management, इत्यादी इत्यादी. हे त्यांच्या गावीही नसते.

"आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार" - ह्या उक्तीप्रमाणे यांच्या बरोबर फिरणारे clients भलत्याच गोष्टीना (मौज -मजा , पिकनिक , outing) , trekking समजू लागतात. कुठे तरी resort वर जाऊन पडायचे तर ट्रेकला जाऊ अश्या धारणेने यांचे clients बरोबर येतात.

Trekking च्या नावाखाली पैसे कमवायला ना नाही पण काही बंधने / नियम पाळाल कि नाही ? कि नुसते पैश्याच्या मागे धावणार ?

यांचे clients हि आपण मोजलेल्या पैशात आपल्याला काय मिळणार आहे हे तपासून तरी पाहतात का ? देव जाणे. ज्यांच्या बरोबर आपण जाणार त्यांचे qualification काय ? अनुभव काय ? या गोष्टी विचारात घेतल्या पाहिजेत.

माझ्या मते या अशा कंपन्यांना किवा सर्व trekking संस्थासाठी एक regulatory body हवी. जी certify करेल कि फलाना –फलाना संस्था लोकांना घेऊन जाण्यासाठी योग्य आहे कि नाही ? हे व्हायला हवे कारण बरेचशे कार्यक्रम हे थेट सह्भागीच्या जीवाशी निगडीत असतात. उदा. Rappelling (हे एक वेगळेच प्रकरण आहे, ज्याला निष्कारण glamour प्राप्त झाले आहे …त्याबद्दल नंतर कधीतरी) , valley crossing, flying fox, Tyrolean traverse इत्यादी इत्यादी.

साधारण १० वर्षांपूर्वी मुंबईतिल एका १६ वर्षीय मुलाचा हिमालयातील ट्रेकमधे मृत्यु झाला. कारण होते High Altitude Sickness अणि जबाबदार होते High Altitude Sickness बद्दल अनभिज्ञ leaders. माझ्या समोर झालेला किस्सा सांगतो. १९९२ ला मी गोचाला पाससाठी गेलो होतो . एका मेम्बरला १ ल्या कॅम्पलाच (बखीम – 9000 ft) त्रास सुरु झाला . खोकला , डोकेदुखी , उलट्या वगैरे . आमच्या लीडरला altitude sickness बद्दल काहीही माहिती नव्हती. रेस्ट हाउसच्या नजीक असलेल्या एका धनगराकडे मदत मागितली गेली. त्याने सांगितले कि याला अमानवी शक्तींनी पछाडले आहे , पूजा करावी लागेल मग बरा होईल. आणि देवाशप्पथ सांगतो – पूजा झाली , त्याच्या वरून उदबत्त्या आणि तांदूळ फिरवले गेले , मंत्र – तंत्र झाले . त्याच्या प्रकृतीमध्ये तसूभरहि फरक पडला नाही. २ दिवसांनी सुदैवानी त्याला युक्सम (५४०० ft) ला हलवले आणि काही काळात तो बरा झाला. तर आमचा लीडर एवढा qualified (?) होता .

सर्वाना विनंती कि कोणाही बरोबर फिरा , पण खालील गोष्टी तपासून पहा -

> लीडरचे qualification आणि अनुभव काय आहे ? त्याने Basic / advance mountaineering course किवा तत्सम काही प्रशिक्षण घेतले आहे का ?
> आपण देत असलेल्या पैशातून नक्की काय सोयी आपल्याला मिळणार आहेत ?
> Emergency Kit आणि First Aid Kit सोबत आहे का ? आणि ते वापरायची माहिती आहे का ?
> Medical Emergency साठी काय back-up आहे ?
> इतर क्षेत्रातील कोणी experts बरोबर असणार आहेत का ? (ऐतिहासिक माहितीसाठी , पक्षी निरीक्षणासाठी etc.)
> राहण्याची / Toilet ची काय सोय आहे ?
> कंपनी सोबत आधी जाऊन आलेल्यांची माहिती घ्या आणि त्यांचे अनुभव जाणून घ्या

तुम्हाला काही प्रश्न इथे add करायचे असतील तर जरूर कळवा.

- राजन महाजन
२६ फेब्रुवारी २०१०

Tuesday, February 23, 2010

तंबी दुराई

बरेच दिवस काहीच लिहिलेले नाही …..काही सुचतच नाहीये :( . क्रिकेटमध्ये जसा bad patch असतो तसे झालेय.

लिहिण्यासारखी , पेक्षा सांगण्यासारखी एकच गोष्ट झाली… मागच्या आठवड्यात तंबी दुराई भेटले.
जे लोकसत्ता वाचतात त्यांना तंबी दुराईची वेगळी ओळख द्यायला नको. ज्यांना माहित नाही त्यांनी ह्या लिंक वाचा.

http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=49269:2010-02-19-12-36-40&catid=105:2009-08-05-07-53-54&Itemid=118 http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=45536:2010-02-05-09-51-56&catid=157:2009-08-10-09-15-43&Itemid=170 http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=45527:2010-02-05-08-55-39&catid=105:2009-08-05-07-53-54&Itemid=118 http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=43949:2010-01-30-16-03-00&catid=105:2009-08-05-07-53-54&Itemid=118 http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=38397:2010-01-08-11-37-09&catid=105:2009-08-05-07-53-54&Itemid=118

आवडीचा लेखक भेटण्याचा , त्याच्याशी प्रत्यक्ष संवाद साधण्याचा आनंद अवर्णनीय आहे. पु.ल. ना भेटलो होतो तेव्हा असाच आनंद झाला होता

सध्या एवढेच ….

- राजन महाजन
२४ फेब्रुवारी २०१०

Tuesday, February 9, 2010

क्रिकेट


दोन दिग्गज नेत्यांची परवा झाली भेट,
चर्चेचा विषय होता only क्रिकेट.
राज्यात बाकी सारं आलबेल आहे,
क्रिकेटशिवाय सर्वांचेच जीवन व्यर्थ आहे.
पाणी, महागाई, आत्महत्या, बेरोजगारी, दहशतवाद....सारे सारे विसरून जाऊया,
चला....सारे मिळून क्रिकेटच्या नशेत बुडून जाऊया.


- कवी अनपढ (राजेंद्रकुमार महाजन)
९ फेब्रुवारी २०१०