Wednesday, July 28, 2010

काही सुचत नाही


लिहावे अस वाटत, पण शब्द सुचत नाही
मनात खूप येत, पण कागदावर उतरत नाही.
सर्व तुंबून राहते, मन मोकळे होत नाही
दोन ओळी लिहिल्या की आनंदाला सीमा राहत नाही.

Monday, July 12, 2010

हरा नाहीतर मरा


हरा नाहीतर मरा

फुटबॉल विश्वचषक संपला. जेतेपद स्पेनने पटकावले. सर्व संघ जिंकायचेच या इर्शेने खेळत होते. त्याच इर्शेने सर्व वाहिन्या खेळाच्या बातम्या सातत्याने दाखवत होत्या. या बातम्यांमधील एक बातमी ठळकपणे माझ्या लक्षात राहिली. कारण कोणताही संघ जेव्हा खेळतो (कोणताही खेळ) तेव्हा त्यामागचा उद्देश असतो जिंकणे, येनकेन प्रकारेण. फक्त सिनेमामध्ये या खेळाचा उद्देश वेगळा असु शकतो. उदा. लगानमध्ये क्रिकेटचा सामना जिंकल्यावर शेतसारा माफ होतो. ही बातमी पाहण्याच्या आधी जर मला कोणी सांगितले असते की जिंकण्याचा उद्देश हा आपल्या प्राणाची तमा न बाळगता, जिंकल्यावर आपला मृत्यू होऊ शकतो हे माहीत असूनही, राष्ट्रप्रेमाखातर जिंकणे आणि प्राणाची आहुती देणे, हा असु शकतो, तर माझा विश्वास कदापि बसला नसता. पण अशी घटना घडलेली आहे, १९४२ साली.

युक्रेनमध्ये फुटबॉल हा खेळ प्रसिद्धीस येत होता. त्यांचा Dynamo Kiev हा संघ अत्यंत बलवान मानला जाई, या संघाने राज्य पातळीवर चांगला खेळ केला होता. १९४१ मध्ये नाझी सैन्याने त्यावेळच्या युक्रेनवर हल्ला केला. युद्धाच्या धामधुमीत संघाची वाताहत झाली, खेळाडू सैनिक म्हणून युद्धात सहभागी झाले. Kiev शहरावर नाझी सैन्याने कब्जा मिळवला आणि काही खेळाडू युद्धकैदी झाले.

Dynamo Kiev चा गोल कीपर, Nikolai Trusevich,

नाझिनी ताबा घेतलेल्या Kiev मधे एका बेकरीमध्ये कामाला लागला. बेकरी मालक फुटबॉल फॅन होता. त्याच्या पुढाकाराने, त्याने इतर खेळाडूंची जमवाजमव करून, FC Start हा संघ चालू केला. त्यात ८ खेळाडू Dynamo Kiev चे होते. ह्या संघाचा सामना, सैन्यातील वेगवेगळ्या देशांच्या संघांशी झाला. त्यानी हंगेरीचा संघ, रोमानियाचा संघ, जर्मनी चा संघ अशा एकंदरीत सात संघांचा पराभव केला तेही योग्य साहित्य, आहार आणि परिस्थिती नसताना. युद्धात पराभूत झालेल्या Kiev मधील संघ, विजयी सैन्याला फुटबॉल मधे हरवू लागला. यामुळे खेळात पराभूत होणार्‍या सैन्याचे मनोबल खच्ची होऊ नये आणि युद्धात पराभूत Kiev नागरिकांचे मनोबल उंचावू नये म्हणून नाझी सैन्याने FC Start संघाचा सामना जर्मनीचा बलाढ्य संघ Flakelf शी आयोजित केला.

मुख्य सामन्याआधी झालेल्या सराव सामन्यामध्ये FC Start ने Flakelf संघाचा ५ – १ ने पराभव केला. मुख्य सामन्याची तारीख ठरली ९ ऑगस्ट १९४२. नाझी सैन्यातील अधिकार्‍याची रेफ्री म्हणून नेमणूक झाली जेणेकरून Flakelf संघाचा जिंकण्याचा मार्ग सुकर व्हावा. सामन्या दरम्यान FC Start खेळाडूना धमकी देण्यात आली की जर तुम्ही सामना जिंकलात तर त्याचे परिणाम चांगले होणार नाहीत आणि हरणेच तुमच्या फायद्याचे आहे.

Flakelf संघाने सुरुवाती पासून FC Start संघाच्या खेळाडूंवर ह्ल्ला सुरू केला. बॉल पेक्षा जास्त ते खेळाडूना लाथा मारू लागले, त्याना पाडू लागले. पण त्यांच्या सर्वा फौल्सकडे रेफ्रीने दुर्लक्ष केले. FC Start च्या गोलकीपरच्या ,Nikolai Trusevich, डोक्यात दोन वेळा लाथा मारण्यात आल्या पण रेफ्रीने त्याकडे लक्ष दिले नाही. FC Start ने Flakelf संघाच्या हिंसक खेळा विरुद्ध वेळोवेळी अपील केले पण रेफ्री ने त्यांचे काहीही ऐकायचे नाही असे ठाम ठरवले होते. अशा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये, दहशतीला/ हिंसेला न घाबरता, जीवाची पर्वा न करता, FC Startच्या खेळाडूनी आपला लाजवाब नैसर्गिक खेळ केला आणि Flakelf ला ५ – ३ ने हरवले. त्या ९० मिनिटांमध्ये त्या खेळाडूंची मानसिक स्थिती काय असेल याची नुसती कल्पना केली तरी माझ्या अंगावर काटा उठतो.

सामन्यानंतर काही दिवसांनी FC Start च्या सर्वा खेळाडूना एकेक करून काही ना काही कारणानी अटक करून त्यांची रवानगी नाझी छ्ळ छावणीमध्ये करण्यात आली. संघाचा कॅप्टन Nikolai Trusevich,Kuzmenko, Klimenko याना गोळी घालण्यात आली. Nikolai Korotkykh आणि २/३ जणांचा छ्ळ छावणीमध्ये झालेला अमानुष छ्ळ सहन न झाल्याने मृत्यू झला. या संघामाधील मोजकेचजण या छ्ळछावणीमधून युद्धानंतर सुटले. नक्की कोण आणि किती मेले या बाबत नेटवर वेगवेगळी माहिती आहे.

या खेळाडूंच्या स्मरणार्थ हा मृत्यूचा सामना ज्या झेनीट स्टेडियममधे खेळला गेला तिथे एक स्मारक उभारण्यात आले. युक्रेन मध्ये आजही या शूर खेळाडूंची वीरगाथा गायली जाते. Dynamo Kiev या संघातील खेळाडूचे लग्न झाले की पत्निसहित या स्माराकाशी आदरांजली वाहण्याची प्रथा इथे पाळली जाते.

अधिक माहितीसाठी ही लिंक पहा http://www.berdichev.org/the_death_match.html

-राजन महाजन
१२ जुलै २०१०

Sunday, July 4, 2010

ब्रेकिंग न्यूज़

ब्रेकिंग न्यूज़  

सर्व न्यूज़ वाहिन्यांची नुसती धांदल चालू असते. प्रत्येक बातमी ही आपल्याच वाहिनीवर सर्वात प्रथम दिसली पाहिजे असा त्यांचा अट्टाहास असतो. आणि तसे झाले नाही की खोटे खोटे...."देखिए ये खबर सबसे पहीले हमारे चानेलपर" असा अविर्भाव आणून लोकाना मुर्ख बनवायचे.

प्रत्येक चॅनेलवर एकाच वेळेस किमान ३/४ बातम्या दिल्या जातात. बातम्या देणारा एक बातमी देत असतो. त्याच्या डोक्यावर एक पट्टी असते तिथे वेगळेच काहीतरी चालू असते. त्याच्या अंगाखाली (पडद्याच्याखाली) दोन पट्ट्यानवर दोन वेगवेगळ्या बातम्या सुरू असतात. कधी कधी २ च पट्ट्या असतात. Just In , Whats making news, Whats New, News Flash, Breaking News, दिवसभरात, साधारण अशी नावे त्यांना असतात. जेव्हा आपण चॅनेल सरफिंग करतो आणि अशा बातम्या एकदम वाचल्या जातात तेव्हा मजा येते. त्या तिन्ही पट्ट्यानवरील बातम्यांचा एकमेकांशी काहीही संबंध नसतो पण जर आपण तो जोडला तर घटकाभर करमणूक नक्की होऊ शकते. करून पहा. पुराव्यानी शाबित करतो.


MS Dhoni is Engaged
CM Ashok Chavan gives a warning

-----------------------

महिनदरसिंग धोनी की छोटिसी प्रेम कहानी
रैना, आर पी, चावला, रोहित भी शामिल

----------------------

आईमुळेच चांगली शिकवण मिळाली
१५ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश

----------------------

महेंद्रसिंग धोनीचा साखरपुडा
भाजपाचा भारत बंदचा इशारा
महाराष्ट्रशासनाचे प्रतिबंधात्मक उपाय

----------------------

अभिषेक - रावण अच्छी फिल्म है
वो कर रहा है सबसे धोका

----------------------

राखी सावंत बिग बॉस से बाहर
मुंबई है परेशान

----------------------

Sharad Pawar new ICC President
Lingerie Model vows to strip


- राजन महाजन
५ जुलै २०१०

Thursday, July 1, 2010

थोतांड


बरेच दिवस हा विषय डोक्यात घोळत होता, लिहायला मुहूर्त सापडत नव्हता. पुन्हा एक वीडियो टीवीवर पहिला आणि आता लिहील्याशिवाय राहावत नाहीये.

त्यात दाखवले होते - रायबरेली येथे एक बाबा लहान मुलांचे रोग बरे करण्यासाठी येणार्‍या लोकाना मुलांना गटरच्या पाण्यात आंघोळ घालण्याचा सल्ला देत होता आणि लोक त्यांच्या वर्षा - दोन वर्षांच्या मुलांना त्या पाण्यात नखशिखांत न्हाऊ घालत होती. मुले ओरडत, रडत होती पण अंधश्रद्द आई-वडिलांना कसलेही भान नव्हते. त्या मुलांच्या आरोग्याला हानिकारक गोष्ट आपण करत आहोत याची जाणीव त्याना नव्हती. या पाण्यामुळे त्याना बरे करण्याऐवजी भयंकर किटाणूंच्या स्वाधीन करत आहोत हे त्यांच्या गावीही नव्हते. त्या बाबापेक्षा मला या लोकांचा जास्त राग आला. स्वत:हून खड्ड्यात जाण्यासारखे होते हे. अडाणी लोकच हे करू शकतात असे मात्र नाही. चांगले शिकले-सवरलेले लोकही अशा बाबांच्या जाळ्यात अडकतात.
बर्‍याच बाबांच्या लीला वेळोवेळी उघडकीस आल्या आहेत. कित्येक बाबांवर गंभीर आरोप झालेले आहेत, कित्येकानी तुरुंगाची हवा खाल्लेली आहे. अगदी अलीकडचे उदाहरण म्हणजे स्वामी नित्यानंद. यांच्या काम क्रिडानचे वीडियो यू-ट्यूब वर उपलब्ध आहेत. स्वामीबद्दल बरेच छापुन आलेय, टीवीवरही बरेच दाखवण्यात आलेय. नुकतीच त्यांची तुरुंगातून सुटका झाली. मग त्यानी पश्चात्तापाचे नाटक केले.

काही महिन्यांपुर्वी "इच्छाधारी संत स्वामी भीमनंद्जी महाराज चित्रकूटवाले" अशा लांबलचक नावाच्या बाबाचा पर्दाफाश झाला. बाबा वेश्या पुरविण्याचे काम करायचे असे उघडकीस आले. बर्‍याच शहरात त्याचे जाळे पसरले होते. त्यातून त्याने ५०० कोटीची माया जमवल्याचा आरोप आहे. या लिंक पहा -

आसारामबापु हे मोठे प्रस्थ आहे. त्यांच्या आश्रमात एका महिन्यात ४ मुलांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे त्यांच्याभोवती संशयाचे वातावरण निर्माण होऊन ते गोत्यात आले. अजूनही काही प्रकरणांमधे ते अडकले आहेत. काही जमीन बळकावल्याच्या केसेस आहेत, काही फसवणुकीच्या. http://www.indianexpress.com/news/cult-&-controversy-the-story-of-asaram-ashr/347163/ मध्यंतरी तर त्यांनी पोलिसाना आव्हान दिले की हिंमत असेल तर मला अटक करून दाखवा.

सत्य साईबाबा ह्यांचे अनेक राजकीय नेते, उद्योजक, तारे-तारका भक्त आहेत. पण तेही वादांपासून दूर राहू शकलेले नाहीत. त्यांचे चमत्कार हे कोणीही साधारण जादुगार करू शकतो असे जादुगारांचे म्हणणे आहे. अलाहाबाद येथील प्रा. नायर यानी सत्य साईबाबाना आव्हान दिले आहे की तुमचे सारे चमत्कार मी करू शकतो...तुम्ही खरच बाबा असाल, तुमच्या मधे दैवी शक्ति असेल तर मी सांगतो ते करून दाखवा. यू-ट्यूब वरदेखील
http://www.youtube.com/watch?v=hWomaejpSkg बाबांचे चमत्कार हे निव्वळ हातचलाखी आहे हे दर्शवणारे असंख्य वीडियो आहेत. तसेच त्यांच्यावर आरोप करणारे, त्यांच्या विरोधात बरेचसे लिहिले गेले आहे. हे दोन ब्लॉग्स मला सापडले. http://saibabaexposed.blogspot.com/2002/07/sai-baba-shiva-or-sadhaka.html , http://exposedsaibaba.blogspot.com/2009/05/expose-of-fraud.html

बंगलोरच्या जवळ सत्य साईबाबा सारखा दिसणारा सिव साई बाबा आहे. हा बाबा कमी आणि गारुडी जास्त वाटतो. याचे सापाबरोबरचे वाहयात चाळे पहा. http://www.youtube.com/watch?v=cmeY6likhOs

श्री श्री रवि शंकर यांच्या आश्रमात काय गोंधळ झाला....बाबांचे म्हणणे की मला मारण्यासाठी गोळीबार झाला पण अध्यात्माचे कवच आश्रामाभोवती असल्याने कोणालाच काहीही इजा पोहचली नाही. तपासात असे निश्पन्न झाले की कुत्री हकलण्यासाठी केलेला तो गोळीबार होता. केवढा मोठा पोपट झाला.

थप्पड़ बाबाचा हा वीडियो पाहाच. http://www.youtube.com/watch?v=aGag2lZlKlM असे वाटते की जीव घ्यावा ह्याचा. हा बाबा १५/१६ वर्षाचा आहे. लहान मुलांच्या अंगावर काय उभा राहतो, त्याना उचलून फेकून देतो, मारतो. त्यांच्यावर उपचार करण्याच्या नावाखाली काय वाट्टेल तो गोंधळ घालतो. याची उपचार पद्धती हिंसकच आहे. छातित लाथ मारणे, पाठीत लाथ मारणे, मान मुरगळणे, हात मुरगळणे.

ठोककुडू बाबा, बोलेन बाबा, पाइलट बाबा, कमलीवाले बाबा,कर्नालचा पानीवाला बाबा अश्या बर्‍याच बाबांचे प्रताप internet वर उपलब्ध आहेत. टीवीवर सुद्धा यांचे फसवणुकीचे प्रकार सतत दाखवत असतात. तरीही लोकांचे डोळे उघडत नाहीत, (की ते मुद्दाम डोळेझाक करतात).

बाबांचे पीक येतच राहते आणि त्याना भक्तगण मिळताच रहातात. बाबा होणे हा सध्याचा सर्वात किफायतशीर धंदा झालेला आहे. अशा बाबा, बापू, भगवान, महाराज, अवतार, अम्मा, माता ई. लोकांच्या मागे लागण्याची गरज का निर्माण होत असेल ? हा प्रश्न मला सारखा भेडसावत राहतो.

- राजन महाजन
२ जुलै २०१०