कट्टी बट्टी चे वय केव्हाच सरले,
ओपिंगो बैटींगोचे दिवसही मागे पडले,
आयुष्याच्या घाण्याला सर्व जुंपले,
मैत्रीचे बंध मात्र तसेच राहिले. राजन महाजन ५/२/२०१४
विश्वामित्र ऋषी थोर,
केली तपश्चर्या घनघोर,
देवांना लागला घोर,
करो लागले विचार,
सापडला उपाय सुंदर,
मेनके धाडीले भूवर,
मेनका मोठी चतुर,
त्रिभुवनी सर्वात सुंदर,
करुनी क्रीडा कामुक,
केले विश्वामित्रा आतुर,
जाहले दोघांचे मिलन,
तपश्चर्या झाली भंग,
साधला देवांचा कार्यभाग,
ऐका ही कहाणी सज्जन,
सांगी राजन महाजन,
काय शिकशील यातून ?
आपुले हाती नाही मन.