Thursday, June 24, 2010

तेवढ्यात










ही कविता साधारण एक वर्षापूर्वी लिहिलेली आहे. Orkutवर अपलोड केली होती. ती ब्लॉगवर आणत आहे म्हणजे सर्वाना आनंद घेता येईल.

राजन महाजन

Tuesday, June 22, 2010

भिकार दिवस


भरवश्याच्या म्हशीला टोणगा, दुष्काळात तेरावा महिना, तोंड दाबून बुक्क्यांचा मार, आभाळ फाटल्यावर ठिगळ कुठे कुठे लावणार ? या सार्‍या म्हणिंची प्रचीती एका दिवसात आली तर काय अवस्था होईल ? अगदी तशीच अवस्था माझी झाली . काही दिवसच असे असतात, पार करून टाकतात. एकही गोष्ट सरळ होत नाही. मनासारखे काहीही घडत नाही. दिवस खराब जातो. अत्यंत भिकारडा दिवस म्हणून त्याची नोंद आयुष्याच्या पटावर होते.

मागच्याच आठवड्यातील गोष्ट. नागपूरच्या फ्लाइट मरायला एकदम सकाळी सकाळी आहेत. वेळेत पोहोचायचे म्हणजे भल्या पहाटे उठावे लागते. शिरस्त्याप्रमाणे मी मेरु बुक करू म्हटले तर बुकिंग डिनाइड असे उत्तर मिळाले. या चक्करमुळे सकाळ अर्धा-पाऊण तास आधी सुरू झाली २ bags आणि मी अशी वरात रस्त्यावर आली. रिक्षाच मिळेना. TMT ची बस आली त्यानी तीन हात नाक्याला उतरलो. समोरच टॅक्सी पाहून धन्य झालो. टॅक्सीत शिरलो. मीटर झाकलेले आढळले, चौकशीनंतर कळले की meterमध्ये काही प्रॉब्लेम नाही ….उगाचच झाकून ठेवलेय. कांजूरमार्गला पोहोचलो तरी मीटर काही पुढे सरकेना, साडेसतरावरच ठिय्या मांडून बसले होते. सावध होऊन पुन्हा चौकशी केली. उत्तर मिळाले – "साहब, समझके दे देना". आता माझी समज, त्याची समज जुळायची म्हणजे कटकटीचे काम. विमानतळावर पोहोचल्यावर, आमची समज जुळून एकाच आकड्यावर यायला आम्हाला बरेच विचार मंथन आणि चर्चा करावी लागली.

विमान उडायला १ तासाहून जास्त उशीर झाला . सकाळचे सर्व परिश्रम मला हसत होते. Air Hostess पेक्षा "हवाई सुंदरी" हा शब्द बरोबर आहे, असे माझे मत आहे. कारण त्यांच्याकडे पाहत - पाहत बारा वेळ जातो . त्याही ramp वर चालल्यासारख्या Aisle मध्ये फिरत असतात . पण या Air-India च्या विमानात हवाई बंदर होता . मिशीचेही केस कलप लावून काळे केलेला बाप्या नशिबी आला.
नागपूर विमानतळावर माझी bag रडत -खडत सर्वात शेवटी आली , बहुदा तिचीही इच्छा नसावी इथे येण्याची. बाहेर पडलो “Mr. Mahajan” नावाचा फलक घेऊन एक जण उभा. त्याला सांगितले कि मी महाजन. अभिजित Group मधून आलास का ? नाही म्हणाला. मग “गायत्री हॉटेल" मधून आलास का ? नाही म्हणाला. अकबर Travels मधून आलोय, 'गोमती इन' मध्ये जायचे आहे, म्हणाला. मी विचार केला कि दुसऱ्या महाजनसाठी आला असेल. मी माझ्या गाडीसाठी शोधाशोध केली, तर गाडीच नाही . थोडी फोनाफोनी झाल्यावर , समजले कि तो गधा माझ्यासाठीच आला होता. 'गायत्री इन' ऐवजी 'गोमती इन' करत होता .
विलंबित विमान सेवा , pick-up चा गोंधळ आणि हॉटेलात जाऊन अंघोळ- पांघोळ करून निघे पर्यंत चांगलाच उशीर झाला . रिक्षाने ऑफिसला निघालो . नागपुरातील रिक्षा म्हणजे एक दिव्य आहे. बऱ्याच रिक्षांची परिस्थिती वाईट आहे . रिक्षाचा फायदा एवढाच कि चालावे लागत नाही , वेळ वाचेलच याची खात्री नसते . आपल्याकडे शाळेतल्या मुलांसाठी असलेल्या रिक्षांना , चालकाच्या पाठीला चिकटून एक पट्टी असते तशी पट्टी इथे जवळ जवळ सर्व रिक्षांना आहे. हे रिक्षा पुराण अशासाठी की रिक्षातून उतरताना पट्टीच्या लोखंडी कडेने माझ्या Pant चे चुंबन घेतले, माझ्या Pantनेही चटकन या प्रेमाला प्रतिसाद दिला वा दोघांनी मिळून मला उघडे पडले. तसाच परत हॉटेलवर जाऊन Pant बदलून ऑफिसात गेलो.

मग ऑफिसातील कटकटी हात धुवून मागे लागल्या. कामे आटपता-आटपता उशीर झाला. ऑफिसची गाडी चुकली. नाइलाजाने परत रिक्षात घुसलो. रिक्षाला पावसाळ्याचे पडदे लावणे इथे कमीपणाचे मानतात. पाऊस पडून गेला होता, सीट ओली होती आणि फाटकिही. ( २५ सीट फाटलेल्या रिक्षामागे, १ सीट न फाटलेली रिक्षा ; असे प्रमाण नागपुरात आहे. क्वचित ती १ रिक्षा वाट्याला येते ) हॉटेलात पोहोचेपर्यंत पार्श्वभाग चिंब भिजला होता.

झोपेपर्यंत अजुन काय काय झेलावे लागणार अशी धाकधुक मनात होती. पण बचावलो. “ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असो द्यावे समाधान” असा विचार आणि येणारा दिवस सरस असु दे अशी देवाकडे प्रार्थना करत झोपी गेलो.

- राजन महाजन
२२ जून २०१०