Thursday, December 10, 2009

मारेकरी


मारेकरी
मी बाला (office boy) ला काही कागद वकिलाकडे देण्यासाठी पाठवले आणि काम झाल्यावर फोन कर म्हणून बजावले. बराच वेळ झाला तरी ह्याचा फोन नाही म्हणून मी sms केला – Where are you ? बालाचे उत्तर आले – Sir, I delievered. या उत्तराने मला भेटलेल्या इंग्रजीच्या मारेकर्यांमध्ये अजून एकाची भर पडली. असे मारेकरी आपल्या अवतीभवती सतत वावरत असतात , रोज आपण त्यांनी केलेले खून ऐकत असतो. अशांपैकी काहीजण मला ठळकपणे आठवतात, त्यांना मी कधीच विसरू शकणार नाही.
कॉलेजमध्ये आमचे Audit चे professor शिंपी एकदा उत्साहाच्याभरात म्हणाले होते – Have you seen the underground flyover near Churchgate Station ? आम्ही खो-खो का हसलो हे त्यांना कळेच ना. पण असा गोंधळ मी बर्याच वेळा ऐकलेला आहे. “अरे, संध्याकाळी भेटूतो VTचा sub-way चा bridge आहे ना तिथे.” असे महिन्यातून / वेळा ऐकू येते.
मी VIP मध्ये असताना एक C & F agent चा माणूस नेहमी ऑफिसमध्ये यायचा. त्याचा आणि माझा कामाच्या निमित्ताने काहीही संबंध नव्हता पण त्याच्या इंग्रजीने मी त्याच्याकडे आकर्षित झालो. त्याची काही ठरलेली वाक्ये होती – I no wait, I busy, I lot of work, you no know, (मी थांबू शकत नाही, मला खूप काम आहे, तुम्हाला काय माहिती). एकदा तो मला म्हणाला – “you 8.20 thane, no ?” मला काहीच पत्ता लागेना. मग म्हणाला “Local, Local”. मग माझी tube पेटली. मी – “हाँ ”. तो - “ I 7.40 kalyan”. मी धन्य झालो.
पण या माणसाचा किंवा बालाचा मला कधीच राग आला नाही कारण त्यांची काहीतरी शिकण्याची धडपड चालू असते. इंग्रजी शिकलो, बोललो कि आपण upmarket होणार अशी त्यांना आशा असते आणि हे जगन्मान्य feeling आहे कि इंग्लिश आले कि आपण ज्ञानी झालो. माझीही कधी काळी अशीच धारणा होती. कालांतराने ती बदलली. भाषेपेक्षा भाष्याला जास्त महत्व आहे हे आता उमगायला लागलेय. बोलण्या मागच्या भावना खूप जास्त महत्वाच्या आहेत आणि त्या दुसर्या पर्यंत पोहोचल्या कि भाषा दुय्यम ठरते हे मी अनुभवावरून सांगू शकतो. कारण मीच इंग्रजीचा खतरनाक मारेकरी होतो. अजून हि आहे पण आता क्वचित कधीतरी खून होतो.
मला शाळेतले दिवस आठवतात. इंग्रजीच्या बाई मला staff room मध्ये उभे करून इंग्रजीचे धडे वाचायला सांगायच्या. कारण मी talked, walked असे शब्द पूर्ण फोड करून उच्चारायचो. म्हणजे waukda, taukda असे. ९0 साली मी NCC मध्ये नुकताच भरती झालो होतो. NCC च्या युनिट चे चीफ, Wing Commander Oberoi, पहिल्यांदाच आम्हाला भेटायला आले होते. त्यांना काय दुर्बुद्धी सुचली आणि त्यांनी मला विचारले – “So Cadet, How did you find this place ?” . मी चाचरत चाचरत उत्तर दिले – “Sir, I came from Thane in Train and reached Churchgate Station and from there I came walking in ‘B’ Road and then to Jai Hind College.” त्यांचा चेहरा एकदम बदलला आणि काय झक मारली आणि या गाढवाला हा प्रश्न विचारला असे भाव त्यांच्या चेहऱ्यावर उमटले. त्यांनी फक्त – " हं " एवढेच म्हटले . त्यांच्या चेहर्यावरचे भाव मी कधीच विसरणार नाही. माझ्या उत्तरामध्ये काय चूक होती हे मला कित्येक वर्षांनी समजले. पण या अशा इंग्रजीमुळे माझ्या NCC मधल्या performance वर काही फरक पडला नाही.
भाषेपेक्षा तुम्ही काय बोलता आणि त्या मागच्या भावना खूप जास्त महत्वाच्या आहेत हे मला पटले ते मला फाड-फाड इंग्रजी बोलणारी आणि इंग्रजीतून विचार करणारी बायको मिळाली तेव्हा. नाहीतर इंग्रजीचा मापदंड असता तर माझ्यासारख्या मारेकर्याला अशी बायको मिळणे केवळ अशक्य. बरेच वर्षे माझा, बोलताना His आणि Her मधेही जबरी गोंधळ व्हायचा. Pollution आणि Population हे दोन वेगळे शब्द आहेत हेच मला माहित नव्हते. कालांतराने मी सुधारलो, कमी खून व्हायला लागले याचे कारण मी कायद्याचे काम करू लागलो त्यातही drafting. माझे इंग्रजी सुधारण्यात Bill Gates चा पण हात आहे. त्याने MS word मध्ये spell check / Synonyms / Thesaurus ची सॉलिड सोय करून दिली.
तुम्हाला असे मारेकरी भेटले तर त्यातून होणारी करमणूक enjoy करा, त्यातून आपण काय बोलू नये याचे धडे घ्या आणि त्यांच्या धडपडीचे कौतुक करा.
जाता जाता शेवटचा किस्सा. मी मुंबई मध्ये बसतो आणि माझे मेन ऑफिस नागपूर मध्ये आहे. मी बालाला sms केला – “Has Boss gone to Phuket ?” . बालाचे उत्तर आले – “NO. Sir is off ”
- राजन महाजन (११ डिसेंबर २००९)

5 comments:

  1. Mi aakaravith astana, ek navin accounts che professor amchya college madhe aale hote. Svvtacha parichy detaana muhnale "I have two daughters" aani board kade vvaltaana (turning) pudhhe muhnale .."both of them are girls."...hasun hasun poot dukhyla lage tya divsi...saglech accounts aani audit che professor sabdaani nahve tar aakdyani vichaar karath asaavith!!! pun toh maanus khup chaangla hotta ---Sabir

    ReplyDelete
  2. Hey! i can easily relate to your blog. Thatz because I listen to Japanese people's English. To eak veglach prakar asto...


    Tyanni tar english bhasechi kattal karun eak navin bhashach develop keli ahe. "Today I dosa", "I reachED new-york tommorrow" ata hya patyala me Happy journey wish karu ka New-york kasa ahe vicharu?

    Proper noun never change.. asa me school madhe astana ghokale hote, pan Japanese loka english cha proper noun pan badaltat. for eg. India = INDO, Australia = OUSUTORARIYA etc etc.

    ReplyDelete
  3. tumcha blog vachayla khup maja yete...
    keep writing... :D

    ReplyDelete