Tuesday, December 22, 2009

Undo


Undo
Computerche एक वैशिष्ट्य छान आहे, मला जाम आवडते. नको असलेल्या क्रिया सुधारण्याची सोय इथे आहे. Undo..Undo..Undo असे नुसते click करत जायचे कि केलेल्या कृती काढून टाकता येतात किंवा बदलता येतात. Latest MS Office तर म्होप गोष्टी काढून बदलायला मदत करतो.
असे एखादे feature आयुष्यात असते तर काय बहार आली असती. आयुष्याशी निगडीत नावडत्या क्रिया, स्वत:च्या आणि दुसर्यांच्या, बदलण्याची आयती सोय झाली असती. अगदी मुळापासून सुरुवात करूया. जन्म घेण्याची action ctrl+Z करून थेट अभिषेक बच्चन – राय झालो असतो. एका दगडात सुख, समृद्धी, धन, ऐश्वर्य, ऐश्वर्या हे सगळे पक्षी मारता आले असते.
नावाबद्दल मी स्वतंत्र लिहिले आहे. बारश्यात ठेवलेले “राजेंद्रकुमार” Undo करून मी ह्रितिक, रितेश, रणबीर atleast “अक्षयकुमार ” ठेवले असते .
लहानाचा मोठा झालो ठाण्यात ……. ctrl+Z……पेडर रोड , जरा जास्तच होतंय ना ? शिवाजी पार्क च्या खाली NO तडजोड.
मेरा बस चले तो …मी संपूर्ण अभ्यास आणि सदृश्य गोष्टी सगळ्यांच्याच आयुष्यातून Undo करून टाकीन. मागे वळून पाहता आणि सध्याची college life पाहता वाटते, शाळा आणि कॉलेज मधील काळ अगदीच मुळमुळीत आणि अळणी गेला. मैत्रिणी होत्या तश्या थोड्याशा …..पण Girl Friend नव्हती. मैत्रीण आणि Girl Friend यात फक्त भाषेचा नाही तर बराच मोठा फरक आहे हे मला कळले तो पर्यंत वेळ निघून गेली होती. त्यामुळे मोठ्ठा UNDO आणि धमाल शालेय / कॉलेज जीवन.
मग Undo होईल ती नोकरी ……नोकरी बदलून आरामाचे जीवन किंवा स्वत:चा business. ट्रेनचा, बसचा दगदगीचा प्रवास, सुट्टीसाठी application सारे सारे undo..undo..undo. घराजवळील ऑफिस, गाडीने अथवा चालत ऑफिसला जाण्याचे सुख आणि वाटेल त्या वेळी कामाला दांडी हे सर्व त्या ठिकाणी येईल.
या माझ्यासाठी Undo करण्याच्या गोष्टी झाल्या पण परोपकाराचे / समाजहिताचे काय ?
सर्व राजकारण्यांचे , VVIP चे सुरक्षा कवच , Undo.
शेतकऱ्यांच्या आत्महत्या , Undo.
26/11 चा हल्ला , Undo.
नक्षल, तालिबानी आणि मावो वाद्यांनी केलेल्या निष्पाप लोकांच्या हत्या, Undo.
निष्पाप बालकांचे कुपोषणाने झालेले मृत्यू, Undo
त्सुनामी , फ्यान , Undo
आकाशाला भिडलेली महागाई , Undo
& Last but not the least….
सर्वांचे लाडके पु . ल. , त्यांचा मृत्यू Undo…Undo…Undo !!
“तुका म्हणे उगी रहावे, जे जे होईल ते ते पाहावे " च्या धर्तीवर म्हणावेसे वाटते “तुका म्हणे Undo करावे, जे जे नको ते बदलून घ्यावे”
-- राजन महाजन
२२ डिसेंबर २००९

6 comments: