Tuesday, May 11, 2010

ARC of N

नुकतीच “ARC of N” मध्ये admission घेतली. मी पोहायला सुरुवात केली (२५ /२८ वर्षांपूर्वी ) त्या ठाणे महानगर पालिकेच्या मारोतराव शिंदे जलतरण तलावाची आठवण झाली. आपसूकच तुलना सुरु झाली.

सुरुवात झाली नावापासून . “ठाणे महानगरपालिकेचा मारोतराव शिंदे (मा.शिं.) जलतरण तलाव ” आणि “ARC of N” (Aquatic Recreation Club of Nair’s). “ARC of N’ कसे झोकदार आणि stylish वाटते . मा.शिं. २५ मी लांब आणि २५ मी रुंद पण ‘L’ आकाराचा आहे , बाजूला छोटा baby pool आहे . ARC चा मुख्य तरण तलाव ५० मी लांब आणि २५ मी रुंद (olympic Size) आहे , बाजूला छोटा baby pool आहे , स्वतंत्र diving पूल आहे १६ मी लांब आणि २५ मी रुंद , खोली ४.५ मी आणि महिलांसाठी बंदिस्त (Indoor) पूल आहे (तो प्रत्यक्ष पहिला नाही ……तो बाहेरूनच दाखवतात.... दुष्ट लेकाचे).

मा.शिं. मध्ये एक batch ४५ मिनिटाची, त्यातहि पहिली ५ / १० मिनिटे आत घुसण्यात, shower घेण्यात, कपडे बदलण्यात जायची. दिवसाला १ वेळा गेलं कि खेळ खतम. मग थेट दुसर्या दिवशी जायचे. ARC ची वेळ सकाळी ६–१० व संध्याकाळी ५.३० - ८.३०, इच्छा असेल तर पूर्ण ७ तास पोहलात तरी हरकत नाही. मा.शिं.ला आत जाण्यासाठी रांग लावायला लागायची, त्यासाठी १० मिनिटे आधी जायचो. ARC मध्ये रांग – बिंग काय नाय, हवे तेव्हा जा.

ARC मध्ये स्वच्छता आणि आरोग्याची विशेष काळजी घेतली जाते. इथले पाणी नुसते chlorination केलेले नसते तर त्याही पुढील आधुनिक प्रक्रिया पाण्यावर केलेली असते अशी माहिती माझा मित्र ज्येष्ठ पाणीतज्ञ अमेय गोखले याने पुरवली. पाणीतज्ञ गोखले पुढे म्हणाले कि लवकरच या पाण्यावर Ozone प्रक्रिया होणार आहे… (टीप - डोळ्याला त्रास होऊ नये म्हणून पोहण्याचा goggle आणि केस राठ होऊ
नयेत म्हणून डोक्याला रबराची टोपी अशी सर्व आयुधे चढवून, हि माहिती पुरवली गेली). मा.शिं.चे पाणी बेकार आणि वास मारणारे आहे असे पाणीतज्ञ गोखल्यांचे मत आहे पण हे मत पडायला तज्ञाची गरज नाही हे मी सांगू शकतो.

ARC मध्ये ११ shower rooms आणि ८ changing rooms आहेत, वर फिरणारे पंखे आहेत. Shower room मध्ये गरम पाण्याचा नळहि आहे. shower/changing rooms आणि reception area मध्ये मंद आवाजात संगीत वाजत असते. मा.शिं.मध्ये किती shower/changing rooms आहेत ते आता आठवत नाही पण एवढे ठळकपणे आठवते कि त्या एवढ्या जास्त नव्हत्या, ज्या होत्या त्यातील निम्म्यांचे दरवाजे/कड्या तुटलेल्या होत्या. गरम पाणी, पंखे आणि संगीत असली नाटके नव्हती.

मा.शिं. मध्ये चौकशीच्या टेबलापलीकडे नेहमीच मी एक थोराड, जाड मिश्या असलेला माणूस पाहिला. त्याची सर्व उत्तरे प्रथम नकारार्थी असायची. ARC मध्ये चौकशीसाठी गेलो तेव्हा ठरवले कि पोहायला नाही आलो तरी चौकशीसाठी १५ दिवसातून एकदा चक्कर टाकायलाच पाहिजे. Reception/Registration टेबलापलीकडे एक टंच (अहाहा, काय चपखल शब्द आहे) मुलगी बसते. एवी-तेवी admission घेणारच, पण रोज जाण्यासाठी एक added incentive आणि काही सुंदर पाहिल्याचा आनंद !

मी मा.शिं. ला जायला लागलो (बहुदा दुसरीत असताना) तेव्हा ५० रुपये वार्षिक शुल्क होते. आठवी /नववी मध्ये पोहायला जायचे बंद केले तेव्हा १०० रुपये शुल्क होते. पोहायला जायचे बंद केले कारण शिकवण्यांचे खूळ सुरु झाले. त्याने अभ्यासात काही फरक नाही पडला पण खेळणे नक्की कमी झाले. असो. सध्या तिथे दीड ते दोन हजारच्या मध्ये शुल्क आहे. ARC मध्ये मी ७७२१ रुपये भरले वर्षासाठी. पोहता येते म्हणून बरे नाहीतर ६०० रुपये महिन्याकाठी कोचिंगसाठी द्यावे लागले असते. मा.शिं.मध्ये हे कोचिंगचे वेगळे पैसे असली लफडी नव्हती. तिथे कोणत्याही कापडाची आणि आकाराची अर्धी चड्डी चालायची. ARC च्या नियमाप्रमाणे swimming costume पाहिजेच.

शेवटी, एक अतिरिक्त उपयुक्त माहिती सांगतो. ARC मधील मुख्य तरणतलाव Unisex साठी आहे. हि माहिती मला join झाल्यावर मिळाली आहे…....नाहीतर तुम्ही खडूस लोक म्हणाल कि म्हणूनच मी एवढे पैसे भरून ARC मध्ये पोहायला जातोय.

- राजन महाजन
११ मे २०१०

4 comments:

  1. he pani tadyna gokhale pani tanchai ver kahi upay sangtil ka?

    ReplyDelete
  2. @vinayak: pani tanchayee war jaalim upay .. save water use paper.. shakyato bus che ticket upayogaat anave ..!

    ReplyDelete
  3. hahahah:) nice.:):) reception varchi tancha mulgi pan pohayla yete kay? tasa asel tar form gheun thev mazyasathi:):):)

    ReplyDelete