Monday, March 15, 2010

एक्लम खाजा

एक्लम खाजा,
धोबी राजा,
तिराण बोके,
चार चकोटे,
पंचल पांडव,
सैंया दांडव,
सत्तक टोले,
अश्टक नैले,
नवे नवे किल्ले,
दंसी गुलामा,
अक्कल खराटा,
बाल मराठा. 

माझ्या वयाच्या सर्वाना उक्त पंक्तींचा चटकन संदर्भ लागला असेल. गोटे (गोटया नाहीत) घेऊन खेळण्याचा हा खेळ दिवस-दिवस चालत असे. ज्याच्यावर पिदी यायची तो खपायचा. दोन-दोन दिवस पिदी चालायची. असाच दुसरा टीम पाडून खेळायचा खेळ म्हणजे राजा – राणी. पण एक्लम खाजाची सर त्याला नव्हती.

TV चा उदय तेव्हा झालेला होता. पण सुदैवाने गजरा, छायागीत, करमचंद, नुक्कड, किलबिल असे काही मोजकेच कार्यक्रम, तेही ठराविक वेळेत (संध्याकाळी एक - दोन तास) दाखवले जायचे. त्यामुळे करमणुकीसाठी खेळाशिवाय पर्याय नव्हता. हक्काचे अंगण होते. Society मध्ये चोहीकडे गाड्या park केलेल्या नसायच्या. झाडायला सोपे पडते म्हणून सर्वत्र concreteची जमीन नव्हती. आता मुलांनी गोटया खेळायचे म्हटले तरी गल करायला जमीनच नाही.

विविध प्रकारचे खेळ आठवतात ज्याची नावेही सध्या ऐकू येत नाहीत. विषामृत, डब्बा ऐसपैस, कुरघोडी, पायावर-पाय, लगोरी, विटी-दांडू. काय झाले या खेळांचे माहित नाही. सध्या मुलांना TV वरचे खेळ पाहून (Takeshi Castle, unbeatable banzuke, WWF) स्वत: न खेळताच आनंद मिळतो. ते चांगले कि वाईट या वादात मला नाही शिरायचे. पण आमचे बालपण जरा हटके होते, हे नक्की.

- राजन महाजन
१५ मार्च २०१०

1 comment:

  1. फटाक्कन २५ वर्षं मागं नेलंस गड्या! ...बोरिवलिला योगानंद सोसा. मी आत्याकडे गेल्यावर तिथे एक टिंबोरी विंचू नांवाचा सांघिक खेळ खेळायचो. आता विसरायला झालय! कोणाला आठवत असेल तर सांगा. संघाच्या शाखेतही विविध देशी खेळांची रेलचेल असते, पण त्याही सध्या कमी झाल्यात.. एक गोष्ट खरी, even आपण ट्रेक्स करतो तरी, हल्ली आपल्या मोकळ्या पायाला माती गेल्या किती वर्षांत लागलेय?, १०० मी. मोकळ्या पायांनी कधी धावलोय? जरा आठवून बघा..मस्त विषय पण लेख थोडा आटोपता घेतलायंस कां?

    ReplyDelete