Friday, January 1, 2010

YZ


YZ
भारतात राजकारण्यांना व तत्सम VIPs ना मिळणारी सुरक्षा हि X, Y, Z ani Z+ अशा गटांत विभागलेली आहे. कोणत्या सुपीक डोक्यातून हि गटांची नावे आली त्याला सलाम. “Yxx Zxxxx” लोकांसाठी YZ सुरक्षा.
जो जास्त YZ आहे त्याला Z+ आणि जो कमी त्याला X. या YZ ना नक्की भीती आहे तरी कसली ? आपल्या कर्मामुळे लोक आपल्याला मारून टाकतील याचीच बहुदा यांना भीती असणार. गांधीजीनी आपल्याला धोका आहे हे माहित असूनहि सुरक्षा नाकारली होती. सुरक्षाकवच हि आता प्रतिष्ठेची बाब झाली आहे. जुने नेते हे लोकनेते होते……सध्याचे सगळे राजकीय नेते आहेत. लोकांना आपला वाटावा असा नेताच नाही. "लोकांचे सगळे आपले" असे नेते आहेत.
२६/११ ची घटना झाल्यावर सुरक्षिततेमध्ये वाढ झाली, पण कुणाच्या ? मंत्रालायाबाहेरची सुरक्षा वाढली आणि राजकीय नेत्यांची शोभा करून घेण्याची आयती सोय झाली. रोज २/३ बॉम्ब प्रूफ , बुलेट प्रूफ गाड्या , फोर्से- १ commandos सकट मंत्रालायाबाहेर उभ्या रहातात. नेत्यांचे सुरक्षा कवच वाढले कि राज्याची आणि राष्ट्राची सुरक्षा कशी वाढते ? हा प्रश्नच आहे. कोणीहि उपट-सुंभ उभा राहतो आणि म्हणतो मला धमकीचे phone आले, द्या सुरक्षा. तुलाच कसे phone येतात ?, च्यायला ...... आम्हाला का नाही कधी कोणी धमकीचे phone करत. साल्यानो …तुम्ही कामेच सगळी उलट - सुलट, बेकायदेशीर करणार तर धमक्या नाहीतर काय फुले येणार तुमच्यासाठी ?? आपला जीव मोलाचा आणि सामान्य लोक मेले तर लोकसंख्या कमी होण्यास मदत होते अशी या YZ नेत्यांची समजूत आहे कि काय ? आमच्या पैश्यातून तुम्हाला संरक्षण आणि आम्ही किड्या-मुंगी सारखे मरायचे ?
समजा, एखाद्या YZ नेत्याला मारले …खून झाला त्याचा तर कोणाला वाईट वाटणार आहे ? कोण रडणार आहे त्याच्यासाठी ? ज्यांचे व्यावसायिक हितसंबंध त्याच्यात गुंतले आहेत आणि त्याच्या मरण्याने ज्याला व्यावसायिक नुकसान होणार आहे ते सोडून इतर सर्व सुटकेचाच निश्वास टाकतील. त्यांना सुरक्षा देणारे police सुद्धा......
YZ VIPs नि जर उलट -सुलट धंदे सोडले आणि लोकसेवा, देशसेवेसाठी स्वत:ला वाहून घेतले तर त्यांना कोणाहि पासून भीती राहणार नाही. त्यांच्या मागे - पुढे असलेले police आणि force हि अशा YZ गिरी पेक्षा अजून चांगल्या विधायक कामांसाठी वापरता येईल.
- राजेंद्रकुमार महाजन
१ जानेवारी २०१०

6 comments: