Wednesday, January 6, 2010

K(y)a साब !!

K(y)a साब !!
“आईला, हे कसाब हुशार निघालं रे !” हेंड Constable डोईफोडे हातातला paper खाली ठेवून म्हणाले. “का हो ?” पलीकडून Constable मान्यांनी विचारणा केली.

“अरे …हुश्शार म्हणजे लईच हुश्शार आहे हा कसाब. बाकीच्या ९ अतिरेक्यांप्रमाणे मेला नाही, स्वत:ला गोळी घालून घेणे सहज शक्य होते कि ? मग का नाही घातली ? का नाही अल्लाला प्यारा झाला ?” Head Constable डोईफोडे.

“का नाही झाला ?” माने विचारतात.

HC डोईफोडे - "त्याने भारताच्या न्यायव्यवस्थेचा आणि राजकारणाचा बरोबर अभ्यास केला असणार, १०१ टक्के सांगतो. जिंदा राहिला आणि आता मजा करतोय सरकारी पाहुण्यासारखा. त्याला पक्के ठाऊक कि पकडलो गेलो कि काही झाले तरी मरणार नाही आपण. भारताचे पोलीस आपली जंक्शन काळजी घेणार.

Constable माने - “आणि तसेच होतेय कि …आता १ वर्ष होऊन गेलेय आणि हा कसाब राजासारखा राहतोय. ज्याला भर चौकात मारून टाकायला पाहिजे, त्याला काही होऊ नये म्हणून आपण त्याच्या पुढे – मागे धावतोय.”

HC डोईफोडे - "अरे किती चोचले पुरवायचे ह्याचे. ह्याला वकील द्या. जेलमध्ये वेगळा सेल द्या. बिर्याणी खावीशी वाटते म्हणून बिर्याणी द्या. आणि हे सगळे सरकारी खर्चातून. त्या जेलच्या बाहेर राहणाऱ्या लोकांना त्याच्या security पायी जीणे नकोसे झालेय. त्यांचा रोजचा रस्ता बंद करून टाकलाय, त्यामुळे तिथे taxi, बस जात नाहीत. दुकाने, धंदा नाहीत म्हणून बंद आहेत. मजा आहे नाही, हा १५० लोकांना मारून मजेत राहतोय आणि हे आपले लोक काही चूक नसताना, मारून घेतायत.”

Constable माने - "मला एक मान्य आहे कि आपल्या न्यायव्यवस्थेप्रमाणे त्याला खटला न चालवता आरोपी ठरवता येणार नाही , पण काही time चे limit आहे कि नाही ? एवढी clear केस आहे, मग महिन्यात निकाल लावून, फाशी देवून टाकायची, तर हे काय उद्योग चालू आहेत, काही कळत नाही."

HC डोईफोडे – "ह्या अतिरेक्याला प्रसिद्धी तरी किती ? रोज ह्याची एक तरी बातमी छापून येते. ह्याच्यावर कोणतरी picture पण काढणार आहे म्हणे. जेलमध्ये जाऊन एखादा पत्रकार " कसाबजी, आपको १५० लोगोंकी हत्या करने के बाद, कैसा महसूस हो रहा है ?" असे विचारून त्याची फुल मुलाखत घेऊन आला तरी मला आश्चर्य नाही वाटणार."

HC डोईफोडे – "माने, ज्या पद्धतीने हा खटला चाललाय ना , त्यावरून मला तर वाटतेय कि हा कसाब, ह्यातून बाहेर निघणार."

Constable माने – "काय सांगताय ?"

HC डोईफोडे – "अजून ४ वर्ष काय ह्या खटल्याचा निकाल लागत नाही, बघ. लागलाच तर परत सुप्रीम कोर्ट आहे. त्यानंतर राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज आहे. जिवंत राहायला खूप काही करायची गरज नाही कसाबला. नुसते “मी निर्दोष आहे, मी काही केले नाही” एवढे जपत राहिला तरी पुष्कळ झाले."

Constable माने – "हे बाकी खरं आहे तुमचे."

HC डोईफोडे – "मला एक भीती वाटतेय. काही तरी खटपटी करून त्याने सिद्ध केले कि मी भारतीयच आहे आणि चांगल्या वागणुकीबद्दल त्याला १२/१४ वर्षांनी जेलमधून सोडून दिले, तर लगेच ह्याला कोणतरी पार्टी निवडणुकीचे तिकीट नक्की देईल. हा एवढा हुशार आहे कि निवडून पण येईल आणि मग आपल्याला त्याला सलाम मारून म्हणावे लागेल......K(y)a साब !!"


- राजन महाजन
६ जानेवारी २०१०


टीप - कथेतील पात्रे काल्पनिक आहेत पण भावना एकदम खऱ्या आहेत.


5 comments:

  1. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  2. pratyek manasachya manatale vichar ahet he, akdam prabhavi pane mandalele. Fakt akach gochi ahe, ti mhanaje he vichar tya Haramkhor Sarkar paryant pochanr nahit kadhich. Kinva te pochun denar nahit muddamun

    ReplyDelete
  3. he chanach Vidambanach ahe Bharatiya nyay vyavastheche

    ReplyDelete